Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींकडून पुरस्कार, तर महाराष्ट्रातील 17 वर्षाच्या अर्णवला मिळाला सन्मान!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vaibhav Suryavanshi national child award : वीर बाल दिनानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने 20 मुलांना सन्मानित केलं. यावेळी 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा देखील पुरस्कार मिळाला.
advertisement
1/5

वीर बाल दिनानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने 20 मुलांना सन्मानित केलं. यावेळी 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा देखील पुरस्कार मिळाला.
advertisement
2/5
विजय हजारे स्पर्धेत मणिपूरविरुद्ध सामना बुडवून बिहारकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी दिल्लीत हजर झाला. त्यावेळी त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
advertisement
3/5
सर्व मुलांनी त्यांच्या कुटुंबाचे, समाजाचे आणि संपूर्ण देशाचे नाव उंचावले. म्हणून, या मुलांच्या कुटुंबांचे मनापासून अभिनंदन... अशा प्रतिभावान आणि आशादायक मुलांसाठी पुरस्कार सोहळा अभिमानी आहे, असं राष्ट्रपदी म्हणाल्या.
advertisement
4/5
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या प्रत्येक विजेत्याला एक पदक आणि एक प्रमाणपत्र दिले जाते. यासोबत पुरस्कार विजेत्यांना 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला एक लाख रुपये मिळाले आहेत.
advertisement
5/5
दरम्यान, महाराष्ट्रातील 17 वर्षीय अर्णव महर्षी याला विज्ञान श्रेणीत पुरस्कार मिळाला. अर्णवकडे एआय सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन आहे, ज्याचे पेटंट आणि कॉपीराइट भारत सरकारने घेतले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींकडून पुरस्कार, तर महाराष्ट्रातील 17 वर्षाच्या अर्णवला मिळाला सन्मान!