Fish : पहिल्यांदाच मासा खाणार आहात? शेफने सांगितलं सुरुवात करण्यासाठी बेस्ट फिश कोणता
- Published by:Priya Lad
Last Updated:
First Time Fish Eaters Tips : पहिल्यांदाच मासे खायचा म्हणजे बहुतेक लोक फक्त बिनकाट्याचा किंवा बोनलेस माशाचा विचार करतात. पण यापेक्षाही आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या लक्षात घ्यायला हव्या.
advertisement
1/5

तुम्ही आजवर कधीच मासे खाल्ले नाहीत पण आता मासे खायची इच्छा झाली आहे. किंवा कुणाच्या घरी गेल्यावर किंवा पार्टीला गेल्यावर सगळे जण मासे खाण्यासाठी आग्रह करत आहेत. पहिल्यांदाच मासा खाणार आहात, तर मासे खायला सुरुवात कशी करायची? कोणता मासा पहिल्यांदा खायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
2/5
सामान्यपणे कोणता मासा पहिल्यांदा खायचा तर सामान्यपणे आपल्या डोक्यात असतं की विनाकाट्याचा म्हणजे बोनलेस किंवा ज्यात काटे कमी असतील. पण यापेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या पहिल्यांदाचा मासे खाताना लक्षात ठेवायला हव्या. त्याबाबत शेफनी माहिती दिली आहे.
advertisement
3/5
पहिल्यांदाचा मासा खाणार असाल तर पहिलं म्हणजे ताजा मासा खा. कारण सुरुवातीलाच तुम्ही शिळा मासा खाल्ला, त्याचा वास तुम्हाला आला तर तुमच्या आयुष्यातूनच मासा निघून जाईल, असं शेफ तुषार वैद्य यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं.
advertisement
4/5
आता तुम्ही स्वत: मासे घरी बनवणार असाल तर ताजा मासा कसा ओळखायचा याचीही माहिती त्यांनी दिली आहे. माशाची त्वचा कडक आणि तजेलदार दिसायला हवी, कल्ला उघडून पाहा तो लाल असेल तर मासा ताजा. जर तुम्ही घरात मासे बनवणार नसाल तर एखाद्या विश्वासार्ह ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये जा. जिथं तुम्हाला ताजा मासा खायला मिळेल.
advertisement
5/5
दुसरं म्हणजे पहिल्यांदाच स्ट्राँग फ्लेवर्सचे मासे खाऊ नका. सामान्यपणे मासे म्हणजे सगळ्यात आधी तोंडावर नाव येतं ते बांगडा, रावस अशा माशांचं. बहुतेक लोक हेच मासे खातात. पण त्यांच्यासोबत तुम्ही हे मासे खाऊ नका. कारण तुम्हाला ते आवडतीलच असे नाही. त्यामुळे कमी फ्लेवर्सचे मासे जसं की पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबील असे मासे खा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Fish : पहिल्यांदाच मासा खाणार आहात? शेफने सांगितलं सुरुवात करण्यासाठी बेस्ट फिश कोणता