Helmet : बाईक चालक सावधान, आता हेल्मेट असूनही बसू शकतो 1000 रुपयांचा दंड; वाहतूक पोलिसांचा नवा नियम तुम्हाला माहितीये का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहितीये का? फक्त डोक्यावर हेल्मेट असून चालत नाही, जर ते नियमानुसार नसेल तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
advertisement
1/8

आपण घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडलो की, सर्वात आधी हाताला लागतं ते म्हणजे 'हेल्मेट'. मग ते पोलिसांच्या भीतीपोटी असो किंवा स्वतःच्या सुरक्षेसाठी; हेल्मेट घालणं आता आपल्या सवयीचा भाग झालं आहे. अनेकदा सिग्नलवर पोलीस दिसले की आपण घाईघाईने हेल्मेट डोक्यावर चढवतो आणि सुटकेचा निश्वास सोडतो. पण, तुम्हाला माहितीये का? फक्त डोक्यावर हेल्मेट असून चालत नाही, जर ते नियमानुसार नसेल तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
advertisement
2/8
वाहतूक पोलिसांनी आता केवळ हेल्मेट आहे की नाही, हे पाहण्याऐवजी ते 'कोणतं' आहे, यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत सुरू झालेली ही सक्ती नेमकी काय आहे आणि दंड टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/8
अनेकजण स्वस्त मिळतात म्हणून किंवा केवळ पोलिसांना दाखवण्यासाठी साधे, प्लास्टिकसारखे हलके हेल्मेट वापरतात. जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता रस्त्यावर वाहन चालवताना भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित केलेले हेल्मेट असणे अनिवार्य आहे.
advertisement
4/8
जर तुमच्या हेल्मेटवर ISI मार्क नसेल, तर ते बेकायदेशीर मानले जाईल. अशा विना-प्रमाणित हेल्मेटवर 1000 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
advertisement
5/8
भारतीय मानक IS 4151:2015 नुसार तयार केलेले हेल्मेटच आता वैध मानले जातील. हे मानक हेल्मेटची गुणवत्ता, मजबूती आणि अपघाताच्या वेळी डोक्याला मिळणारी सुरक्षा लक्षात घेऊन ठरवण्यात आले आहे.
advertisement
6/8
दंड टाळण्यासाठी 'या' 3 गोष्टी तपासा:1. ISI लोगो: हेल्मेट खरेदी करताना त्यावर 'ISI' चा मार्क असल्याची खात्री करा. लोकल बनावटीचे 'हॅट' सारखे दिसणारे हेल्मेट आता चालणार नाहीत.2. हेल्मेट स्ट्रॅप (पट्टा): हेल्मेट डोक्यावर असूनही जर त्याचा पट्टा (Strap) लावलेला नसेल, तरीही पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. हेल्मेट घट्ट आणि योग्य पद्धतीने लावणे गरजेचे आहे.3. गुणवत्ता: केवळ दिसायला स्टायलिश असून चालणार नाही, तर ते अपघातात डोक्याचे संरक्षण करेल इतके मजबूत असावे.
advertisement
7/8
पोलिसांची कडक मोहीमशहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर आता हाय-टेक कॅमेऱ्यांच्या मदतीने चालान फाडले जात आहेत. यामध्ये केवळ विना-हेल्मेट चालकच नाही, तर चुकीचे हेल्मेट घालणारे, अल्पवयीन चालक आणि एका दुचाकीवर तिघेजण (Tripling) बसणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे मुख्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरणे, म्हणूनच आता ही कडक पावले उचलली जात आहेत. याशिवाय HSRP नंबरप्लेट नसणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे.
advertisement
8/8
तुमचं आयुष्य 1000 रुपयांच्या दंडापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे. त्यामुळे केवळ पोलिसांपासून वाचण्यासाठी नाही, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी योग्य 'ISI' मार्क असलेल्या हेल्मेटचाच वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Helmet : बाईक चालक सावधान, आता हेल्मेट असूनही बसू शकतो 1000 रुपयांचा दंड; वाहतूक पोलिसांचा नवा नियम तुम्हाला माहितीये का?