TRENDING:

RC ट्रान्सफर करायचीये? RTO एजेंटला पैसे देण्याचं नो टेन्शन, घरबसल्या होईल काम

Last Updated:
जुनी कार किंवा बाइक खरेदी केल्यानंतर अनेकांना आरसी ट्रान्सफर करण्यासाठी आरटीओ एजेंटची मदत घ्यावी लागले. पण आता याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता.
advertisement
1/11
RC ट्रान्सफर करायचीये? RTO एजेंटला पैसे देण्याचं नो टेन्शन, घरबसल्या होईल काम
जुनी कार किंवा बाइक खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा खुप सोपं झालंय. मात्र अनेक लोक अजुनही कागदपत्राच्या कामाला घाबरतात. अनेकदा लोक आरसी (Registration Certificate) ट्रान्सफर करण्यासाठी आरटीओ एजेंटकडे जातात. त्यांना हजारो रुपये कमीशन देऊन ती आपली काम करतात.
advertisement
2/11
आजच्या डिजिटल युगात, भारत सरकारच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस पोर्टलने ही प्रोसेस खुप सोपी केलीये. ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करून आरसी ट्रान्सफरची प्रोसेस पूर्ण करू शकता. कोणत्याही एजंटला कमिशन न देता तुम्ही तुमच्या खरेदी केलेल्या वाहनाचा आरसी तुमच्या नावावर कसा ट्रान्सफर करू शकता याची स्टेप-बाय-स्टेप माहिती पाहूया.
advertisement
3/11
डॉक्यूमेंट जमा करा : आरसी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये ओरिजिनल आरसी , फॉर्म 29 आणि 30, विमा प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, चेसिस नंबरची प्रिंट.
advertisement
4/11
ट्रान्सफर कशी करावी : हे डॉक्यूमेंट जमा केल्यानंतर प्रोसेस सुरू करु शकता. ऑनलाइ आरसी ट्रान्सफरची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस कधी आहे पाहूया. सर्वात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला (parivahan.gov.in) भेट द्या.होमपेजवर Online Services टॅबच्या आत Vehicle Related Services वर क्लिक रा. यानंतर तुमचं राज्य निवडा जिथे गाडी रजिस्टर्ड असले.
advertisement
5/11
आता एक नवीन पेज ओपन होईल. येथे आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर नोंदवा आणि Proceed वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसली. ज्यामध्ये तुम्हाला Transfer of Ownership निवडावे लागेल. गाडीच्या चेसिस नंबरचे अखेरचे 5 अंक नोंदवा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो टाकताच गाडीची पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर येईल.
advertisement
6/11
आता तुम्हाला खरेदीदाराची (स्वतःची) माहिती, जसे की नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. या फेजमध्ये तुम्हाला Transfer of Ownership फीस भरावी लागेल. आरसी ट्रान्सफरची फीस वेगवेगळ्या राज्य आणि वाहनाच्या प्रकार (टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर) च्या आधारावर वेगळी असू शकते. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाइ पेमेंट करु शकता. पेमेंटनंतर पावती डाउनलोड करणे विसरू नका.
advertisement
7/11
शुल्क भरल्यानंतर काय करावे? : कागदपत्रे अपलोड करा. काही राज्ये तुम्हाला सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची परवानगी देतात. जर तुमच्या राज्यात हे उपलब्ध असेल तर फॉर्म 29, 30 आणि इतर कागदपत्रे अपलोड करा. प्रत्यक्ष पडताळणीसाठी तुम्हाला आरटीओला भेट द्यावी लागू शकते.
advertisement
8/11
अपॉइंटमेंट बुक करा : अनेक आरटीओमध्ये तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी वेळ घ्यावी लागते. पोर्टलवरच ‘Book Appointment’ चा ऑप्शन मिळतो तो निवडा.
advertisement
9/11
गरज असल्यास आरटीओमध्ये जा : निवडलेल्या तारखेला, तुम्हाला खरेदीदार आणि विक्रेत्याच्या स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांसह आरटीओला भेट द्यावी लागू शकते. खरंतर, Contactless Services अंतर्गत आता अनेक राज्यांमध्ये आरटीओला भेट देण्याची गरज नाहीशी झाली आहे आणि सर्व काम आधार-बेस्ड ई-केवायसी द्वारे केले जाते.
advertisement
10/11
या गोष्टींची काळजी घ्या : गाडी खरेदीच्या 30 दिवसांच्या आत आरसी ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागेल. उशीर झाल्यास दंड लागू शकतो. तुम्ही दुसऱ्या राज्यातील गाडी खरेदी करत असाल तर पहिले त्या राज्याच्या आरटीओकडून एसओसी घ्यावी लागेल. गाडी लोनवर चालू असेल तर पहिले बँकेकडून एनओसी घेऊन Hypothecation Termination ची प्रोसेस पूर्ण करा. नंतरच आरसी ट्रान्सफर होईल.
advertisement
11/11
एकूणच काय तर एकदा तुम्ही ही प्रोसेस समजून घेतली की, तुम्हाला मध्यस्थांना अतिरिक्त 2,000 ते 5,000 रुपये द्यावे लागणार नाहीत. सरकारी शुल्क खूप कमी आहे, साधारणपणे दुचाकीसाठी 300-500 रुपये आणि कारसाठी 600-1000 रुपये द्यावे लागतात. थोडा वेळ काढून, तुम्ही केवळ पैसे वाचवू शकता यासोबतच नाही तर फसवणूकही टाळू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
RC ट्रान्सफर करायचीये? RTO एजेंटला पैसे देण्याचं नो टेन्शन, घरबसल्या होईल काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल