TRENDING:

एक एकर शेती अन् ४ लाखांचं उत्पन्न! पाहा काय आहे फुलंब्रीच्या सुनील पाटलांचा 'शेवंती' पॅटर्न ?

कृषी

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील शेतकरी सुनील पाटील हे गेल्या 12 वर्षांपासून फुलशेती करत आहेत. सुरुवातीच्या काळात 2013 मध्ये गावरानमधील रतलम नावाचे वाण होते. 2020 मध्ये भाग्यश्री लागवड केली. यंदा 1 एकरमध्ये शेवंतीमधील अमृता व्हाईट साडेआठ हजार आणि यष्ट्रा व्हाईट दीड हजार अशी दोन्ही मिळून 10 हजार फुलरोपांची लागवड केलेली आहे. तसेच या शेतीच्या माध्यमातून 4 लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याचे सुनील पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Dec 26, 2025, 14:13 IST
Advertisement

प्रकाश महाजनांचा शिवसेनेत प्रवेश,VIDEO

मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यानी पक्षप्रवेश केला.त्यामुळे मनसे नेते राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. नेते महाजन यांनी शिंदेचं कौतुक करत त्यांनी या प्रवेशाचं श्रेय हे आरोग्य दूत मंगेश यांना दिले आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 15:57 IST

जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले,"पक्ष बदलू गद्दारांसाठी.." VIDEO

राज्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर सध्या पक्ष सोडणं,बदलणं आणि इतर घडामोडी राजकारणात पाहायला मिळत आहेत.मिरजेत 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. तेव्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, "पक्ष बदलणाऱ्यांच्या प्रभागात ताकदीनं निवडणूक लढू. पक्ष बदलणारे,गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे."

Last Updated: Dec 26, 2025, 15:39 IST
Advertisement

हिवाळ्यात त्वचेला खोबरेल तेल लावण्याचे अनेक फायदे, पण योग्य पद्धत कोणती? पाहा Video

अमरावती : हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त चेहरा आणि हात पायाची काळजी घेतली जाते. पण, हिवाळ्यात तर पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते. मग पूर्ण शरीराच्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवायचा आहे तर अनेक जण शरीराला खोबरेल तेल लावतात. तरीही काही वेळानंतर त्वचा कोरडी होते आणि आपल्याला रखरख वाटायला लागतं. मग शरीराचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दलचं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 15:25 IST

प्रशांत जगतापांचा काँग्रेस प्रवेश,VIDEO

राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यांचा हा प्रवेश एकदम जल्लोषात साजरा करण्यात आला. नेते प्रशांत जगताप यांना कोण होता शिवाजी? आणि विठ्ठलाची प्रतिकृती असलेलं पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते.

Last Updated: Dec 26, 2025, 15:08 IST
Advertisement

मुलांना जॅम आवडतो पण आरोग्याची भीती वाटते? स्ट्रॉबेरीच्या हंगामात घरीच बनवा केमिकल फ्री जॅम

Food

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा म्हटले की मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी येत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. स्ट्रॉबेरी पासून वेगवेगळे पदार्थ करतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे स्ट्रॉबेरी जॅम. लहान मुलांना खूप असा आवडतो पण विकतच्या जॅममध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात. पण आपण घरी जॅम करणार आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये तयार करणार आहोत. तर याची रेसिपी बघू.

Last Updated: Dec 26, 2025, 14:41 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/कृषी/
एक एकर शेती अन् ४ लाखांचं उत्पन्न! पाहा काय आहे फुलंब्रीच्या सुनील पाटलांचा 'शेवंती' पॅटर्न ?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल