काय म्हणाला रिंकु सिंग?
मी कधीच इतके दिवस तुमच्याशी न बोलता घालवले नाहीत. तुमच्याशिवाय आयुष्य कसे चालेल हे मला माहित नाही. पण मला प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल, असं म्हणत रिंकुने मनातल्या भावना बोलून दाखवल्या. तुम्ही मला शिकवलं की कर्तव्य प्रथम येते, म्हणून मी फक्त मैदानावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुमचं स्वप्न पूर्ण झाले आहे. मला फक्त असं वाटतंय की तुम्ही माझ्यासोबत असता, असं म्हणत रिंकुने वेदना बोलून दाखवल्या.
advertisement
प्रिया सरोज काय म्हणाली?
तर रिंकुची होणारी पत्नी प्रिया सरोजने देखील पोस्ट करत रिंकूचं कौतुक केलं होतं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान, मी एका मुलाची ताकद देखील पाहिली जो त्याच्या वडिलांसाठी, त्याच्या संघासाठी आणि त्याच्या देशासाठी खंबीरपणे उभा राहिला. आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांमध्येही मैदानावर उतरणं आणि विजेता बनणं हे खरोखरच धाडसी कृत्य आहे, असंही प्रिया सरोज म्हणली.
केकेआरची रिंकुला साथ
दरम्यान, प्रत्येक लहान-मोठ्या आनंदात मला तुमची आठवण येईल. बाबा, मला तुमची खूप आठवण येईल... खूप जास्त, असं म्हणत रिंकु सिंग भावुक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्याने त्याच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. तर केकेआरने त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला खांदा देण्याचा प्रयत्न केला. हिंमत ठेव रिंकु.. आम्ही तुझ्यासोबत आहोत, असं केकेआरच्या अधिकृत हँडलवरून म्हटलं आहे.
