TRENDING:

Reel Star Arun Tupe Death : छत्रपती संभाजीनगरजचा प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपेचं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोशल मीडियाच्या जगातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपेचं निधन झालं आहे. राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला आहे. अरुण हा मुळचा छत्रपती संभाजी नगरचा होता. कोण अरुण तुपे नावाने तो इन्स्टाग्रामवर होता. अनेक रील व्हिडीओ तो शेअर करत होता. इन्स्टाग्रामवर त्याला 179K हून अधिक लोक फॉलो करत होते. त्याच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय आणि सोशल मिडिया फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे.
News18
News18
advertisement

अरुण छत्रपती संभाजी नगरच्या बालाजी नगर इथे राहत होता. 10 मार्च रोजी सकाळी त्याचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. त्याला नातेवाईंना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, मृत्यूमागे काय कारण होतं? त्याने आत्महत्या केली का? त्याची कोणी हत्या केली? की नॅशरल डेथ झाली असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

advertisement

अरुणचा मृतदेह घाटी येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. मात्र त्याच्या मृत्यूची बातम्या कळल्यानंतर एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांआधी मुंबईचा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं. तो अनेक महिने आजारी होता. रक्तातील सफेद कावीळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूनंतर देखील चाहत्यांना मोठा शॉक बसला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, शेतकऱ्यानं काय केलं? V
सर्व पहा

( बातमी अपडेट होत आहे. )

मराठी बातम्या/मनोरंजन/
Reel Star Arun Tupe Death : छत्रपती संभाजीनगरजचा प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपेचं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल