Rohit Sharma : रोहित शर्मा शुन्यावर आऊट, पण हिटमॅनला गोल्डन डक करणारा 'उत्तराखंड एक्सप्रेस' देवेंद्र बोरा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Who is Devendra Singh Bora : रोहित शर्मा पहिल्याच बॉलवर आऊट झाल्याने चाहत्यांची निराशा झाली अन् काही प्रेक्षकांनी थेट स्टेडियम सोडलं. रोहितला पाहण्यासाठी मोठी रांग लागली होती
advertisement
1/7

सिक्कीमविरुद्ध सेंच्युरी मारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या हिटमॅनने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रेक्षकांचा हिरमोड केला आहे. पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा आऊट झाला.
advertisement
2/7
रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध 94 बॉलमध्ये 155 धावांची खेळी केली होती. मात्र, उत्तराखंडविरुद्ध रोहित शर्माने सकाळी सहा वाजता स्टेडियमवर पोहोचलेल्या प्रेक्षकांना नाराज केलं. त्याला कारण ठरला 'उत्तराखंड एक्सप्रेस'
advertisement
3/7
रोहित शर्माला शुन्यावर माघारी पाठवणारा बॉलर दुसरा तिसरा कुणी नसून देवेंद्र बोरा आहे. देवेंद्र बोरा याने पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची नस दाबली अन् पुल शॉट खेळायला दिला.
advertisement
4/7
पहिल्याच बॉलवर रोहित पुल शॉट मारायला गेला अन् फिल्डरने थर्ड मॅनवर कॅच घेतला. पहिल्यांदा कॅच सुटल्यासारखं वाटलं पण नंतर जगमोहन नागरकोटी याने कॅच पूर्ण केला.
advertisement
5/7
पण रोहितची विकेट घेणारा देवेंद्र बोरा आहे कोण? तुम्हाला माहितीये का? देवेंद्र सिंग बोरा त्याच्या कारकिर्दीतील फक्त तिसऱ्या लिस्ट ए सामन्यात खेळतोय आणि रोहित शर्मा त्याची पाचवी विकेट ठरली.
advertisement
6/7
या मॅचपूर्वी त्याने हिमाचल प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये 44 रन्स देऊन 4 विकेट्स घेत आपल्या फॉर्मची झलक दाखवली होती. देवेंद्र बोराचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता त्याचा सरासरी 19.5 आणि स्ट्राइक रेट 20.2 इतका प्रभावी आहे.
advertisement
7/7
याआधी त्याने उत्तराखंड प्रीमियर लीगमध्ये (UPL) देहरादून वॉरियर्सकडून खेळताना 6 मॅचमध्ये 10 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही त्याने 15 मॅचमध्ये 41.13 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहित शर्मा शुन्यावर आऊट, पण हिटमॅनला गोल्डन डक करणारा 'उत्तराखंड एक्सप्रेस' देवेंद्र बोरा कोण?