TRENDING:

Indian Railway : ट्रेनचीही होते चोरी, इंजिनला साखळीने का बांधतात? रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं कारण

Last Updated:
Indian Railway Train Engine : तुम्ही पाहिलं असेल जेव्हा ट्रेन रूळांवर थांबलेली असते तेव्हा तिचं इंजिन साखळीने रूळांना बांधलं जातं. यामागील कारण काय आहे माहिती आहे का?
advertisement
1/5
ट्रेनचीही होते चोरी, इंजिनला साखळी का बांधतात? रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं कारण
आतापर्यंत तुम्ही सायकलसारख्या वाहनाला साखळीने बांधलेलं पाहिलेलं असेल. कारण सायकल पडण्याची, चोरीला जाण्याची भीती असते. पण इतकी मोठी ट्रेन तिचं इंजिनही साखळीने बांधलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? ट्रेन बंद असली की एका जागेवर थांबते तरी तिचं इंजिन साखळीने का बांधलं जातं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
2/5
रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा नियम ब्रिटिश काळापासून आहे. जेव्हा एखादी ट्रेन किंवा मालगाडी लूप लाईनवर बराच काळ थांबावी लागते तेव्हा तिची पुढची आणि मागची चाकं साखळ्या आणि कुलूपांनी सुरक्षित केली जातात. ती स्थिर ठेवण्यासाठी चाकाखाली लाकडाचा तुकडा देखील ठेवला जातो.
advertisement
3/5
जेव्हा इंजिन किंवा प्रवासी गाड्या रेल्वे रुळांवर थांबलेल्या असतात तेव्हा सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची चाके साखळ्यांनी बांधली जातात. इंजिन अनवधानाने पुढे किंवा मागे सरकू नये म्हणून हे केलं जातं.
advertisement
4/5
खरं तर इतर गाड्या अनेकदा स्थिर इंजिनांजवळून जास्त वेगाने जातात, ज्यामुळे कंपन होतात. या कंपनामुळे स्थिर इंजिन त्याच्या स्थितीपासून थोडंसं सरकू शकतं, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.
advertisement
5/5
अशा परिस्थितीत इंजिन हलू नये म्हणून ते लोखंडी साखळीने ट्रॅकला बांधलं जातं. हे लोको पायलटद्वारे केलं जातं, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : ट्रेनचीही होते चोरी, इंजिनला साखळीने का बांधतात? रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल