आर्मी-पोलीस भरतीत अपयश, पण शेतीत आलं यश! 23 वर्षांचा विपिन सैनी वर्षाला कमावतो 25 लाख
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हसमतगंज गावातील 23 वर्षीय विपिन सैनी हा तरुण सुरुवातीला सैन्य आणि पोलीस दलात भरती होण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यात अपयश आल्यानंतर त्याने शेतीकडे लक्ष दिले. दोन वर्षांपूर्वी...
advertisement
1/5

आज उत्तरप्रदेशातील सिघनखेडा हसमतगंज गावात राहणारा 23 वर्षांचा विपिन सैनी हा तरुण गावातील इतर तरुणांसाठी एक आदर्श बनला आहे. आपल्या पूर्वजांनी नांगरलेल्या शेतातच एक दिवस आपलं नशीब बदलेल, असं विपिनने कधी मनातही विचार केला नव्हता. विपिनचं सुरुवातीचं शिक्षण गावातील शाळेत झालं आणि त्याने सैदनगरमधून इंटरमीडिएटची परीक्षा पास केली.
advertisement
2/5
यानंतर, त्याने सैन्य आणि पोलीस दलात भरती होण्याचा प्रयत्न केला. दोनदा तो सैन्य दलाच्या मेडिकलमध्ये नापास झाला आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी तो पोलीस भरतीची परीक्षाही पास करू शकला नाही. याच काळात त्याने पाहिलं की, त्याचे वडील शेतीतून चांगला नफा मिळवत आहेत, त्यामुळे त्यानेही शेती करायला सुरुवात केली.
advertisement
3/5
विपिन सांगतो की, त्याला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याला नेहमी वाटायचं की, आपण स्वतःचं काहीतरी करावं. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही, तेव्हा त्याने आपलं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. दोन वर्षांपूर्वी त्याने आपलं शिक्षण सोडून पूर्णपणे शेतीकडे वळला. आज विपिन शेती करतोय.
advertisement
4/5
यामध्ये तो हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना यांची लागवड करतो. विशेष म्हणजे या सर्व पिकांना बाजारात चांगला भाव मिळतो. विपिन म्हणतो की, योग्य पद्धतीने, कष्ट आणि नियोजनाने शेती केली, तर लाखोंची कमाई करता येते.
advertisement
5/5
विपिन सध्या शेतीतून वर्षाला सुमारे 25 लाख रुपये कमावतोय. त्याला मिरची आणि पुदिन्यापासून सर्वाधिक नफा मिळतो. कोथिंबीर आणि टोमॅटोच्या लागवडीतूनही त्याला चांगला फायदा होतो. विपिन म्हणतो की, आता तो शेतीलाच आपलं भविष्य मानतो. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणून अधिक उत्पादन घेण्याचं त्याचं स्वप्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
आर्मी-पोलीस भरतीत अपयश, पण शेतीत आलं यश! 23 वर्षांचा विपिन सैनी वर्षाला कमावतो 25 लाख