जबरदस्त आहे हा प्रीपेड प्लॅन! 99 रुपयांत मिळतो अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BSNL Rs 99 Plan: भारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. कंपनी विविध ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. सरकारी टेलीकॉम कंपनी ग्राहकांना 100 रुपयांपेक्षा कमी प्रीपेड प्लॅन ऑफर करते.
advertisement
1/6

आजकाल 100 रुपयांपेक्षा कमीमध्ये बेसिक व्हॅलिडिटीचे प्लॅनही मिळत नाही. तर BSNL द्वारे 100 रुपयांपेक्षा कमीममध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट्स ग्राहकांना ऑफर केले जातात. चला जाणून घेऊया हा कोणता प्लॅन आहे.
advertisement
2/6
खरंतर आम्ही BSNL च्या 99 रुपयांच्या प्लॅनविषयी सांगणार आहोत. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे, हा शॉर्ट-व्हॅलिडिटीसह देखील येत नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 18 दिवसांची व्हॅलिटिडी दिली जाते. जी खूप चांगली गोष्ट आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनच्या इतर डिटेल्स.
advertisement
3/6
BSNL चा 99 रुपयांचा प्लॅन : सरकारी टेलिकॉम कंपनीचा 99 रुपयांचा प्लॅन एक STV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर) आहे. हा देशभरातील सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन 18 दिवसांच्या व्हॅलिटिडीसह येतो. यामध्ये अनलमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट्स ग्राहकांना मिळतील.
advertisement
4/6
खरंतर या प्लॅनमध्ये ग्राहकांना SMS किंवा डेटा बेनिफिट्स दिले जात नाहीत. अशा वेळी तुम्हाला डेटाची गरज असेल तर तुम्हाला वेगळा डेटा व्हाउचर घ्यावा लागेल.
advertisement
5/6
हा प्रीपेड प्लॅन त्या ग्राहकांसाठी खूप चांगला आहे जे कमी बजेटमध्ये थोड्या व्हॅलिटिडीसह एक प्रीपेड प्लॅन घेऊ इच्छितात. खरंतर BSNL ची एक अडचण अशी आहे की, पूर्ण भारतात कंपनी 4G नेटवर्कही ऑफर करत नाही.
advertisement
6/6
BSNL देशभरात सर्व 4G नेटवर्क लॉन्च करण्याच्या प्रक्रियेत आहे. कंपनीने म्हटलं की, नंतर ते 5G मध्ये अपग्रेड केलं जाईल. जर तुमच्याजवळ 2G/3G सिम असेल तर BSNL रिकमंड करते की, तुम्ही 4G सिममध्ये अपग्रेड करा. हे BSNL द्वारे फ्री ऑफर केले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
जबरदस्त आहे हा प्रीपेड प्लॅन! 99 रुपयांत मिळतो अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा