WhatsAppचा नवा स्कॅम! बनावट चालानचा मेसेज आला अन् एका क्लिकवर उडाले 4 लाख रुपये
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp वर एक बनावट मेसेज आला आणि त्या मेसेजवर क्लिक करताच एका व्यक्तीला तब्बल 4 लाख रुपयांना चुना लागला आहे. हा स्कॅम काय आहे सविस्तर पाहूया...
advertisement
1/7

नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाइन स्कॅम हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये अनेक सर्वसामान्य लोक अडकतात आणि त्यांना आपल्या मेहनतीचे पैसे गमवावे लागतात. दिल्लीमध्ये एक व्यक्ती व्हॉट्सअॅपवर आलेल्या बनावट ट्रॅफिक चालान मेसेजचा बळी ठरला. त्याला 4 लाख रुपये गमवावी लागली. यावरुन दिसतं की, सायबर फसवणूक करणारे हे सरकारी भाषा आणि विश्वासार्ह नावांचा वापर करुन सामान्य जनतेला फसवत आहेत.
advertisement
2/7
टाईम्स ऑफ इंडियामधील एका रिपोर्टनुसार, पीडितेला एक व्हाट्सअॅप मेसेज आला ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की त्याचे ₹1,000 चे ट्रॅफिक चलन प्रलंबित आहे. हा मेसेज ‘NextGen mParivahan’ या नावाने पाठवण्यात आला होता आणि त्यात परिवहन विभागाशी संबंधित शब्द वापरले होते, ज्यामुळे ती सरकारी नोटीस असल्याचे वाटत होते.
advertisement
3/7
त्या मेसेजमध्ये एक लिंक होती, ज्यामध्ये यूझर्सना त्यांचे इनव्हॉइस चेक करण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी त्यावर क्लिक करण्यास सांगितले होते. संशय न घेता, त्या व्यक्तीने लिंकवर क्लिक केले आणि एक अॅप डाउनलोड केला. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, कोणतेही इनव्हॉइस डिटेल्स दिसत नव्हते, परंतु खरे नुकसान काही वेळातच सुरू झाले.
advertisement
4/7
दुपारी 2:59 वाजता पीडित व्यक्तीला एक ईमेल अलर्ट मिळाला. की त्याच्या Amazon ई-वॉलेटचा पासवर्ड बदलला आहे. यानंतर लगेच त्याचा ईमेल आयडी बदलला. काही मिनियांत वेगवेगळ्या बँकांमधून क्रेडिट कार्ड ट्रांझेक्शनचे एसएमएस येऊ लागले.
advertisement
5/7
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सायबर ठगांनी पीडितने सेव्ह केलेले क्रेडिट कार्ड डिटेल्सचा वापर करुन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन ई-गिफ्ट कार्ड खरेदी केले. हे गिफ्ट कार्ड थेट ठगांच्या ईमेलवर डिलिव्हर झाले. ज्यातून पैसे रिकव्हर करणे अशक्य झाले. एकूणच पीडीत व्यक्तीला तब्बल 4.05 लाख रुपयांचं नुकसान झालं.
advertisement
6/7
पोलिस म्हणतात की, ही एक वेगळी घटना नाही. अलिकडच्या काळात व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे पाठवल्या जाणाऱ्या बनावट ट्रॅफिक चालान मेसेजना अनेक लोक बळी पडले आहेत. काही सरकारी सूचना प्रत्यक्षात व्हॉट्सअॅपवर येत असल्याने, फसवणूक करणारे या विश्वासाचा फायदा घेत आहेत.
advertisement
7/7
असं राहा सेफ : पोलिसांनी लोकांना सल्ला दिला की, कोणत्याही ट्रॅफिक चालानची माहिती फक्त Parivahan च्या अधिकृत वेबसाइटवरच चेक करा. अनोळखी लिंक, क्यूआर कोड किंवा तत्काळ पैसे भरा अशी मागणी करणाऱ्या मेसेजपासून सावध राहा. एखादा मेसेज भिती किंवा घाई निर्माण करत असेल तर थांबा, तपासणी करा आणि विचारपूर्वक कोणतंही पाऊल उचला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsAppचा नवा स्कॅम! बनावट चालानचा मेसेज आला अन् एका क्लिकवर उडाले 4 लाख रुपये