Instagramवर 1 लाख व्ह्यूज आल्यावर किती कमाई होते? जाणून घ्या पैसे कमावण्याची ट्रिक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Tips: सध्याच्या काळात सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर कमाईचाही मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. पण यावरुन कशी कमाई करता येते? चला पाहूया.
advertisement
1/8

Instagram Tips in Marathi: स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जे स्मार्टफोन वापरतात ते नक्कीच सोशल मीडियाचा वापर करतात. यात इंस्टाग्राम हे सर्वात आघाडीवर आहे. इंस्टाग्रामचा वापर लोक फक्त एंटरटेनमेंटसाठीच नाही तर पैसे कमावण्यासाठीही करत आहेत. यावर लाखो लोक व्हिडिओ आणि रिल्स बनवून चांगली कमाई करत आहेत. अशावेळी लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न उपस्थित होतो की, त्यांच्या व्हिडिओ किंवा रीलवर 1 लाख व्ह्यूज आले तर त्यांतून किती कमाई होईल?
advertisement
2/8
फक्त व्ह्यूज आल्याने पैसे मिळतात का? : सर्वात आधी समजून घेणं गरजेचं आहे की, इंस्टाग्राम फक्त व्ह्यूज आल्यावर थेट पैसे देत नाही. इंस्टाग्रामच्या कमाईची सिस्टम अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसं की, तुमची ऑडियन्स, एंगेजमेंट, फॉलोअर्स आणि कंटेंटचा प्रकार.
advertisement
3/8
एखाद्या रीलला 1 लाख व्ह्यूज मिळाले, तर तुमचे अकाउंट कमाईसाठी पात्र असेल किंवा तुम्हाला ब्रँड प्रमोशन मिळत असेल तरच ते थेट कमाई निर्माण करते. अनेक क्रिएटर्स प्रति 1 लाख व्ह्यूज सुमारे 500 रुपये ते 5,000 रुपयांपर्यंत कमवू शकतात, परंतु हे प्रत्येक खात्यानुसार बदलू शकते.
advertisement
4/8
ब्रांड प्रमोशनने होते सर्वाधिक कमाई : इंस्टाग्रामवर खरी कमाई नेहमीच ब्रांड डील्स आणि प्रमोशनने होते. ज्यावेळी एखादा क्रिएटरच्या व्हिडिओवर चांगले व्ह्यूज आणि एंगेजमेंट येऊ लागतात. तेव्हा कंपन्या आपल्या प्रोडक्टचा प्रचार करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करतात.
advertisement
5/8
तुमच्या व्हिडिओवर सलग 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूज येत असतील. तर लहान ब्रांडवर पोस्ट किंवा रिलसाठी हजारो रुपये देण्यासाठीही ते तयार असतात. मोठे इन्फ्लुएंसर्सची कमाईत तर एका पोस्टने लाखोंपर्यंत पोहोचू शकते.
advertisement
6/8
Instagram Creator Program आणि बोनस : काही देशांमध्ये इंस्टाग्राम क्रिएटर बोनस आणि रील्सने कमाईचे फीचरही देते. याच्या माध्यमातून क्रिएटर्सला त्यांच्या कंटेंटच्या प्रदर्शनाच्या आधारावर पैसे मिळतात. खरंतर हे फीचर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसते आणि यासाठी काही अटी पूर्ण करावी लागतात.
advertisement
7/8
Affiliate Marketing नेही होते कमाई : इंस्टाग्रामवर पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे अ‍ॅफिलिएट मार्केटिंग. यामध्ये, क्रिएटर कंपनीच्या प्रोडक्टच्या लिंक्स शेअर करतात. जेव्हा लोक त्या लिंकद्वारे खरेदी करतात तेव्हा क्रिएटरला कमिशन मिळते. तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळाले तर त्या लिंकवर क्लिक करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढते, ज्यामुळे लक्षणीय कमाई होऊ शकते.
advertisement
8/8
कंटेंट आणि ऑडियन्स सर्वात आवश्यक : इंस्टाग्रामवर कमाईचं खरं रहस्य चागंला आणि इंट्रेस्टिंग कंटेंट तयार करणे आहे. तुमचे व्हिडिओ लाखो लोकांना पसंत येत असतील आणि ते जास्त शेअर होत असतील तर व्ह्यूज वेगाने वाढतात. यामुळे तुम्हाला इंस्टाग्रामवर कमाई करायची असेल तर फक्त व्ह्यूजवर लक्ष देण्याऐवजी तुमच्या ऑडियन्स आणि कंटेंट क्वालिटी चांगली बनवण्यावर फोकस करणे जास्त गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Instagramवर 1 लाख व्ह्यूज आल्यावर किती कमाई होते? जाणून घ्या पैसे कमावण्याची ट्रिक