TRENDING:

Fridge : फ्रीजमधून ठोकण्याचा किंवा क्लिकिंगचा आवाज आला तर सावधान! समजून जा तो तुम्हाला काहीतरी सिग्नल देतोय

Last Updated:
अनेकदा फ्रीजमधून वेगवेगळे आवाज आल्याचं अनेकांनी अनुभवलं असेल. हे आवाज कधी कधी सामान्य असतात, पण काही वेळा फ्रीजमध्ये काही समस्या असल्याचे संकेत देतात.
advertisement
1/7
फ्रीजमधून ठोकण्याचा किंवा क्लिकिंगचा आवाज? सावधान तो तुम्हाला सिग्नल देतोय
आजकाल फ्रीज हे प्रत्येक घरात असलेली गरजेची गोष्ट बनली आहे. जेवण, फळे, भाज्या आणि डेअरी प्रॉडक्ट्स थंड ठेवण्यासाठी फ्रीज गरजेचा आहे. पण अनेकदा फ्रीजमधून वेगवेगळे आवाज आल्याचं अनेकांनी अनुभवलं असेल. हे आवाज कधी कधी सामान्य असतात, पण काही वेळा फ्रीजमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचे संकेत देतात. त्यामुळे या आवाजांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
2/7
फ्रीजच्या खालून येणारा आवाजजर आवाज फ्रीजच्या खालून येत असेल, तर ड्रेन पॅनमध्ये काही अडथळा असण्याची शक्यता असते. अशावेळी ड्रेन पॅन बाहेर काढून व्यवस्थित ठेवणे किंवा साफ करणे योग्य राहील.
advertisement
3/7
फ्रीजच्या मागून येणारा आवाजफ्रीजच्या मागील बाजूने आवाज येत असल्यास, कंडेन्सर किंवा कंप्रेसरमध्ये काही समस्या असू शकते. कंडेन्सर फॅनमुळे आवाज येत असेल, तर फॅनच्या ब्लेडमध्ये साचलेली धूळ नीट साफ करणे आवश्यक आहे.
advertisement
4/7
फ्रीजच्या आतून येणारा आवाजफ्रीजच्या आतून आवाज येत असल्यास, फॅनमध्ये काही अडथळा असण्याची शक्यता असते. हे तपासण्यासाठी इलेक्ट्रिशियनची मदत घेणे योग्य राहील.
advertisement
5/7
पक्षी किंवा लहान प्राणी सारखा आवाजजर फ्रीजमध्ये पक्ष्यांचा किंवा लहान प्राणी सारखा आवाज येत असेल, तर बाष्पीभवन करणारा पंखा (Evaporator Fan) खराब असण्याची शक्यता असते. यासाठी देखील इलेक्ट्रिशियनची मदत घेणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
ठोकण्याचा किंवा क्लिकिंग आवाजफ्रीजमधून ठोठावण्याचा आवाज येत असल्यास, कंडेन्सर किंवा मोटर नीट काम करत नसल्याचे लक्षण असू शकते.आइस मेकर क्लिकिंग आवाज करत असेल, तर वॉटर लाइन व्हॉल्व्ह सैल असण्याची शक्यता आहे किंवा पाणी पुरवठा नीट जोडलेला नाही. यासाठी देखील इलेक्ट्रिशियनची मदत घ्या.
advertisement
7/7
सोप्या शब्दांत सांगायचं तर फ्रीजमधून येणारा प्रत्येक आवाज वेगळ्या कारणामुळे होतो. काही आवाज सामान्य आहेत, तर काही आवाज तांत्रिक समस्येची खबर देतात. आवाज ओळखून योग्य तो उपाय केल्यास तुमचा फ्रीज सुरक्षित आणि दीर्घकाळ काम करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Fridge : फ्रीजमधून ठोकण्याचा किंवा क्लिकिंगचा आवाज आला तर सावधान! समजून जा तो तुम्हाला काहीतरी सिग्नल देतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल