TRENDING:

तुमचा पगार 40-50 हजार आहे? तुम्हाला किती लोन मिळू शकतं? पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
Loan : अनेकदा आपल्याला काही महत्त्वाचं काम येतं पण आपल्याकडे पैसे नसतात. अशावेळी आपल्या पगारावर किती लोन मिळू शकतं असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6
तुमचा पगार 40-50 हजार आहे? तुम्हाला किती लोन मिळू शकतं? पाहा कॅलक्युलेशन
मुंबई : आपण कितीही पैसा कमावत असलो किंवा सेव्हिंग करत असलो तरीही आयुष्यात एकदा तरी आपल्याला लोन घ्यायची गरज पडते. सध्या तर घरं, गाड्या एवढी महाग झाली आहेत की, लोन घ्यावंच लागतं. कधी-कधी तर मेडिकल एमर्जेंसी किंवा अगदी महत्त्वाच्या कामांसाठीही लोन घ्यावं लागतं. ते ईएमआयमध्ये फेडता येत असल्याने घेणं आणि फेडणं दोन्हीही सोपं झालंय. पण लोन भेटण्याचेही अनेक नियम आहेत.
advertisement
2/6
तुमची लोन घेण्याची क्षमता किती आहे हे तुमचा क्रेडिट स्कोअर सांगतो. हाय क्रेडिट स्कोअरच्या लोकांना कमी व्याजदरात जास्त लोन रक्कम मिळते. एवढंच नाही. तुमच्याकडे दीर्घकाळापासून नोकरीचा अनुभव असेल तर हे तुमची लोन घेण्याची क्षमता मजबूत करते.
advertisement
3/6
होम लोन आणि पर्सनल लोन : तुम्ही होम लोन आणि पर्सनल लोन दोन्हीही घेऊ शकता. मात्र दोन्हीचं व्याज हे वेगवेगळं असेल. तुमचा पगार मंथली 50 हजार असेल, व्याजदर 7% दरवर्षी असेल आणि कर्ज कालावधी 15 वर्षांचा असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जवळपास 25 ते 30 लाखांचं होम लोन मिळू शकतं.
advertisement
4/6
तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज घेतल्यास, नियमांनुसार तुम्हाला बँकेत काही विशिष्ट कागदपत्रे सादर करावी लागतील. हे लक्षात ठेवा की कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त, तुम्हाला डाउन पेमेंट देखील करावे लागेल, जे साधारणपणे 10 ते 20% असते.
advertisement
5/6
पर्सनल लोन : तसंच पर्सनल लोन घ्यायचे असेल आणि तुमचा पगार 40 हजार असेल तर तुम्हाला किमान 9 लाखांपर्यंत पर्सनल लोन मिळू शकतं. लोन घेण्यापूर्वी पाहून घ्या की तुम्ही ईएमआय भरू शकता की नाही. पर्सनल लोन घेण्यासाठी जी व्यक्ती लोन घेत आहे. तिच्याजवळ दरमहा कमाईचा काही तरी पुरावा असायला हवा.
advertisement
6/6
चांगला क्रेडिट स्कोअर टिकवून ठेवा : जास्तीत जास्त बँका 21 ते 60 वयोगटातील लोकांना कर्ज देतात, तसंच काही प्रकरणांमध्ये वयोमर्यादा जास्त किंवा कमी असू शकते. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल, तितकी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या बँकेशी किंवा एनबीएफसीशी संपर्क साधायला विसरू नका. बँक काही विशिष्ट कागदपत्रांची मागणी देखील करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
तुमचा पगार 40-50 हजार आहे? तुम्हाला किती लोन मिळू शकतं? पाहा कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल