टॉवर नसला तरी मोबाईलला मिळणार नेटवर्क; 'ब्लूबर्ड'मुळे गावातील 'नो सिग्नल'ची कटकट मिटली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Signal : गावात गेलं की अनेकांची तक्रार असते की मोबाईलला नेटवर्क नाही किंवा सिग्नल नाही. पण आता नो सिग्नल हा शब्द इतिहासजमा झाला. कारण आता कुठेही जा नेटवर्क नसलं तरी मोबाईलला सिग्नल मिळणार आणि हे शक्य झालं आहे ते ब्लूबर्डमुळे.
advertisement
1/5

डोंगराळ भागात, जंगलात, दुर्गम गावांमध्ये, समुद्रात, सीमावर्ती भागांमध्ये आता मोबाईल नेटवर्कचं टेन्शन नाही. नो सिग्नल आता इतिहासजमा झालं आहे. पूर, भूकंप, चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळीही कॉल, मेसेज आणि इंटरनेट उपलब्ध होणार आहे. हे शक्य झालं आहे ते ब्लूबर्ड ब्लॉक-2 मुळे.
advertisement
2/5
आता ब्लूबर्ड ब्लॉक-2 काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा भारताचा अत्याधुनिक संचार उपग्रह आहे. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी श्रीहरिकोटातून याचं यशस्वी प्रक्षेपण झालं. इस्रोने आपल्या सर्वात बलाढ्य एलव्हीएम-3 रॉकेटच्या मदतीने हा सर्वांत मोठा उपग्रह अवकाशात पोहोचवला आहे.
advertisement
3/5
6100 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत अचूकपणे स्थापन करून इस्रोने भारताची जागतिक स्पेस-टेक सामर्थ्य पुन्हा सिद्ध केलं आहे.
advertisement
4/5
ही प्रक्षेपण मोहीम फक्त वैज्ञानिक यश नाही, तर जगभरातील मोबाइल वापरकर्त्यांसाठी कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय आहे. आपत्तीच्या वेळी हा उपग्रह लाइफलाइन ठरू शकतो. नेटवर्क बंद पडलं तरी एसओएस कॉल, मदतीचा मेसेज, रेस्क्यू टीमशी संपर्क करता येऊ शकेल.
advertisement
5/5
हा उपग्रह सामान्य स्मार्टफोनसाठीच डिझाइन केला आहे. वेगळा सॅटेलाइट फोन, अँटेना काहीच लागत नाही. याचा अँटेना खूप मोठा आहे एकाच वेळी लाखो मोबाइल फोनशी संपर्क करू शकतो. असे आणखी उपग्रह अवकाशात सोडले जातील. त्यामुळे मोबाइल नेटवर्क जगभर समान होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
टॉवर नसला तरी मोबाईलला मिळणार नेटवर्क; 'ब्लूबर्ड'मुळे गावातील 'नो सिग्नल'ची कटकट मिटली