रात्री Wi-Fi आणि मोबाईल डेटा बंद ठेवावा? वैज्ञानिक सत्य पाहून व्हाल चकीत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WiFi and Mobile Data: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन सर्वच वापरतात. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना वायफाय आणइ इंटरनेटची गरज पडते. अशावेळी आपण काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
advertisement
1/8

सध्या डिजिटल युग सुरु आहे. या काळात मोबाईलचा वापर वाढलाय. यामुळेच वायफाय आणि मोबाईल इंटरनेट आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनले आहेत. घर असो किंवा ऑफिस राउटर हे 24 तास चालू राहते आणि स्मार्टफोनही नेहमीच नेटवर्कशी कनेक्ट राहतो.
advertisement
2/8
दरम्यान, रात्रीच्या वेळी वाय-फाय किंवा मोबाईल डेटा चालू ठेवणे आरोग्यासाठी चांगले आहे की ते बंद करणे चांगले असा प्रश्न अनेकांना पडतो. कधीकधी सोशल मीडियावर भयावह कथा समोर येतात, परंतु सत्य समजून घेण्यासाठी सायन्स आणि रिसर्च समजून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
3/8
Wi-Fi राउटर आणि मोबाईल नेटवर्कमधून ज्या लहरी निघतात त्याला EMF म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हटले जाते. या नॉन-आयोनाइजिंग रेडिएशनच्या श्रेणीमध्ये येतात. म्हणजेच यामध्ये तेवढी ऊर्जा नसते की, ते शरीरातील DNA ला नुकसान पोहोचवू शकतील.
advertisement
4/8
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य घरात वापरला जाणारा Wi-F सिग्नल स्थापित सुरक्षा मानकांमध्ये असतो. दीर्घकालीन संपर्काच्या संभाव्यतेवर संशोधन अजूनही चालू असले तरी, सध्या असे कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत की त्यामुळे गंभीर आजार होतात.
advertisement
5/8
काही संशोधनामध्ये असे संकेत मिळाले आहेत की, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि नेटवर्कमधून निघणाऱ्या लहरी या झोपेला थोडं प्रभावित करु शकतात. विशेषतः मेलाटोनिन हार्मोन, जे झोपेसाठी आवश्यक असते. त्यावर थोडा परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र विशेषज्ञ म्हणतात की, Wi-Fi सिग्नल पेक्षा जास्त नुकसान स्क्रीन टाइम आणि उशीरपर्यंत फोनचा वापर करण्याच्या सवयीमुळे होते. सतत नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅक्टिव्हिटी डोक्याला अॅक्टिव्ह ठेवतात ज्यामुळे झोपेत बाधा येते.
advertisement
6/8
मुलांचे मेंदू अजूनही विकसित होत असतात, म्हणून काही डॉक्टर अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला देतात. गर्भवती महिलांनाही अनावश्यक संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसंच, रात्री वाय-फाय चालू ठेवल्याने मुलांना किंवा गर्भातील बाळांनाही थेट नुकसान होते हे अद्याप कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालेले नाही.
advertisement
7/8
या विषयावर संशोधन वर्षानुवर्षे चालू आहे, परंतु मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फायमुळे कर्करोग होतो याचा कोणताही निश्चित पुरावा नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कॉफी आणि लोणच्यासारख्या गोष्टींसह वाय-फायला संभाव्य कर्करोगजन्य म्हणून वर्गीकृत केले आहे. याचा अर्थ असा की धोका खूप कमी मानला जातो, परंतु पुढील संशोधन आवश्यक आहे.
advertisement
8/8
वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर आरोग्यासाठी हे बंद करणे अनिवार्य नाही. मात्र तुम्ही रात्री Wi-Fi किंवा मोबाईल इंटरनेट बंद केलं तर यामुळे वीजची थोडी बचत होते. सायबर सिक्योरिटीचा धोका कमी होतो आणि सर्वात मोठा फायदा असा होतो की, तुमचं डोकं डिजिटल कोलाहलापासून दूर राहून आराम करु शकतं. म्हणजेच निर्णय घाबरुन नाही तर समजदारी आणि सुविधेच्या आधारावर घेणं बेस्ट ठरतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
रात्री Wi-Fi आणि मोबाईल डेटा बंद ठेवावा? वैज्ञानिक सत्य पाहून व्हाल चकीत