कुठं पेट्रोलला पैसे घालवताय? 12 वर्षाच्या चिमुकल्यानं बनवली भन्नाट सायकल, कुठंही फिरा फुकटात!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्मिती होतेय. परंतु, सोलापूरच्या एका 12 वर्षांच्या चिमुकल्यानं सोलार सायकल बनवलीये.
advertisement
1/7

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असतानाच अनेकजण स्वस्तातलं पर्यायी इंधन म्हणून सौर ऊर्जेकडं पाहत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्मिती होतेय. परंतु, सोलापूरच्या एका 12 वर्षांच्या चिमुकल्यानं सोलार सायकल बनवलीये.
advertisement
2/7
अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी असं या चिमुकल्याचं नाव असून फक्त 9 हजारांत त्यानं ही सायकल तयार केलीये. विशेष म्हणजे सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारी ही सायकल बॅटरी संपल्यावर पॅडल वापरून देखील चालवता येतेय.
advertisement
3/7
अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी हा 12 वर्षीय विद्यार्थी सोलापुरातील पानगल शाळेत शिक्षण घेतोय. मदिना चौकात राहणाऱ्या अब्दुल्लाला वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे.
advertisement
4/7
यातूनच त्याने सायकल आणि काही जुने साहित्य गोळा करून सोलार सायकल बनवलीये. ही सायकल बनवण्यासाठी त्याला 6 महिन्यांचा वेळ आणि 9 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. परंतु, त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक होतेय.
advertisement
5/7
सायकलच्या हँडलवर बसवलेल्या सौरपॅनेलच्या माध्यमातून बॅटरी चार्ज केली जाते. एवढेच नाही तर सायकलमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉक सिस्टम, जीपीएस ट्रॅकिंग, व्हॉईस कंट्रोल आणि नेव्हिगेशनसारखी वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहेत. ही सायकल बॅटरीवर 25 किमी आणि संपूर्ण दिवस सौरऊर्जेवर चालू शकते. विशेष म्हणजे त्याने ही संपूर्ण सायकल फक्त 9 हजार रुपयांत तयार केलीये.
advertisement
6/7
दरम्यान, अब्दुल्ला याने अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली आहे. सायकलच्या हँडलजवळ सौरपॅनेल बसविले असून मधल्या पाइपजवळ त्याने बॅटरी बसविली आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ही सायकल 5 ते 6 तास पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवावी लागते.
advertisement
7/7
त्यानंतर ती कोणत्याही अडथळ्यांशिवाय चालते. एवढेच नव्हे तर सूर्यप्रकाश नसतानाही ती इलेक्ट्रिक सॉकेटच्या माध्यमातून चार्ज करता येते. या अनोख्या ई-सायकलने रस्त्यावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
कुठं पेट्रोलला पैसे घालवताय? 12 वर्षाच्या चिमुकल्यानं बनवली भन्नाट सायकल, कुठंही फिरा फुकटात!