Google Map गल्लीत का गोंधळतो? ऐरवी मोठ्या रस्त्यांवर बरोबर चालणाऱ्या नेविगशनला अचानाक काय होतं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला एक गोष्ट त्याच्याबद्दल नक्कीच जाणवली असेल ते म्हणजे मोठ्या रस्त्यावर तो अचूक दिशा दाखवतो, मात्र गल्लीत शिरल्यावर मात्र अनेकदा गोंधळ होतो? असं का? चला तर जाणून घेऊया, यामागचं खरं कारण काय आहे.
advertisement
1/7

आजच्या काळात आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण Google Maps वापरतो. कुठे जायचं, कोणता रस्ता जवळचा आहे, ट्रॅफिक कुठे आहे? हे सगळं काही आपल्या मोबाईलवर काही सेकंदांत समजतं. त्यामुळे Google Maps आता प्रवासाचा साथीदारच बनला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट त्याच्याबद्दल नक्कीच जाणवली असेल ते म्हणजे मोठ्या रस्त्यावर तो अचूक दिशा दाखवतो, मात्र गल्लीत शिरल्यावर मात्र अनेकदा गोंधळ होतो? असं का? चला तर जाणून घेऊया, यामागचं खरं कारण काय आहे.
advertisement
2/7
Google Maps आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वापरतो. यात सॅटेलाइट इमेजेस, Street View कारने घेतलेली छायाचित्रं, वापरकर्त्यांकडून मिळालेली माहिती आणि ट्रॅफिकचा जुना डेटा यांचा समावेश असतो. मोठ्या आणि स्पष्ट रस्त्यांचा डेटा व्यवस्थित उपलब्ध असतो, त्यामुळे ते रस्ते मॅपवर सहज दिसतात.
advertisement
3/7
पण छोट्या गल्ल्या, अरुंद रस्ते किंवा जुन्या वसाहतींमध्ये हीच अडचण निर्माण होते. अशा ठिकाणी Street View कार पोहोचू शकत नाही. अनेकदा उंच इमारती, झाडं किंवा शेड्समुळे सॅटेलाइट इमेजेसही नीट दिसत नाहीत. त्यामुळे त्या भागाचा अचूक डेटा गुगलला मिळणं कठीण जातं.
advertisement
4/7
याशिवाय, गावं किंवा उपनगरातील रस्ते सतत बदलत असतात. नवीन रस्ता तयार होतो, जुना बंद होतो, तर काही ठिकाणी कच्चा रस्ता पक्का बनतो. हे बदल रिअल टाईममध्ये मॅपवर अपडेट करणे नेहमी शक्य नसते.
advertisement
5/7
यामागचं अजून एक कारण म्हणजे GPS सिग्नल. गल्लीत किंवा उंच इमारतींच्या मध्ये गेल्यावर GPS सिग्नल कमजोर होतो किंवा पूर्णपणे ब्लॉक होतो. त्यामुळे मोबाईलला अचूक लोकेशन समजत नाही आणि मॅप चुकीचा रस्ता दाखवतो.
advertisement
6/7
काही गल्लीबोळ इतके गुंतागुंतीचे असतात की त्यांचा अचूक नकाशा फक्त स्थानिक लोकांनाच माहिती असतो. कोणता रस्ता कुठे बंद आहे, कुठून वळायचं हे फक्त त्यांनाच माहीत असतं.
advertisement
7/7
म्हणूनच Google Maps अत्याधुनिक असला तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. विशेषतः गल्लीबोळात आणि गर्दीच्या भागात. म्हणून अशा वेळी फक्त मॅपवर अवलंबून न राहता, थोडं स्वतः निरीक्षण करणं आणि स्थानिकांकडून विचारपूस करणंही तेवढंच आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Google Map गल्लीत का गोंधळतो? ऐरवी मोठ्या रस्त्यांवर बरोबर चालणाऱ्या नेविगशनला अचानाक काय होतं?