TRENDING:

बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ

Last Updated:
Android Unknown Source Setting: सध्याच्या काळात सायबर फ्रॉड खुप वाढले आहेत. ऑनलाइन बँकिंग वाढली आहे, ज्यामुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांना स्कॅम करणं सोपं झालंय. पण काही सेटिंग्सने हे आपण टाळू शकतो.
advertisement
1/6
बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ
Android Unknown Source Setting: आपला देश डिजिटल होत आहे. पण याचाच फायदा घेत सायबर फ्रॉड करणारे हे जास्त अलर्ट झालेय. कारण आता आपल्या स्मार्टफोनमध्ये बँकिंग डिटेल्सपासून पर्सनल डिटेल्स सर्वच असतं. याचाच फायदा घेत फसवणूक करणारे विविध मार्गांनी स्कॅम करतात.
advertisement
2/6
याच कारणामुळे आज आपण एका अशा सेटिंगविषयी जाणून घेणार आहोत. ज्या तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑनलाइन फ्रॉडपासून वाचवू शकतात. तुम्ही ही सेटिंग ऑफ केली नाही तर स्कॅमर्स क्षणार्धात तमचं अकाउंट रिकामं करू शकतात.
advertisement
3/6
या सेटिंगकडे द्या लक्ष : सायबर गुन्हेगार आजकाल स्कॅम करण्यासाठी APK फाइल्सचा वापर करतात. या फाइल्समध्ये मालवेयर एम्बेड करुन यूझरच्या फोनमध्ये पोहोचवले जातात आणि नंतर डेटा आणि पैसा चोरीचा खेळ सुरू होतो. यापासून बचाव करण्यासाठी अँड्रॉइड फोनमध्ये 'Unknown Sources' नावाची एक सेटिंग येते.
advertisement
4/6
ही सेटिंग बंद असेल, तर तुमचा फोन कोणतीही APK फाईल इन्स्टॉल करू शकणार नाही. ही सेटिंग तुमच्या फोनला गूगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणाहून ॲप्स डाउनलोड करण्यापासून प्रतिबंधित करते.
advertisement
5/6
ही सेटिंग ऑन असल्यास काय? : हे सेटिंग ऑन केली तर तुमचा फोन साइडलोडिंगला Allow करतो. म्हणजेज गूगल प्ले स्टोर व्यतिरिक्तही सोर्सेसने अॅप्स डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा की, हे करणं हानिकारक ठरू शकतं. साइडलोडिंगच्या अॅप्समध्ये मालवेयरचा धोका असतो. ज्यामुळे तुमच्या डिव्हाइसला टार्गेट केले जाऊ शकते. त्यामुळे, नेहमी विश्वसनीय स्रोतांकडूनच ॲप्स डाउनलोड करणे योग्य ठरते.
advertisement
6/6
या गोष्टी ठेवा लक्षात : एखादी अनोळखी व्यक्ती लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगत असेल तर सावधान राहा. असे अॅप्स इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला 'Unknown Sources' सेटिंग ऑन करावी लागेल. ज्यामुळे मालवेयरच्या APK फाइल्स इंस्टॉल होऊ शकतात आणि तुमचा फोन मालवेयरने इंफेक्टेड होईल. यामुळे ही सेटिंग नेहमीच ऑफ ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल