TRENDING:

Nagpur Petrol Price: पुण्यानंतर आता नागपुरात वाढलं पेट्रोल, टाकी फुल्ल करण्याआधी चेक करा नवे दर

Last Updated:
पुण्यापाठोपाठ नागपुरातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तुम्ही टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचं प्रत्येक लीटरमागे बजेट कोलमडणार आहे.
advertisement
1/6
पुण्यानंतर आता नागपुरात वाढलं पेट्रोल, टाकी फुल्ल करण्याआधी चेक करा नवे दर
इराण आणि इस्रायल सुद्धसंघर्षात भारताचे हाल व्हायला सुरुवात झाली आहे. LPG गॅसचा तुटवडा, त्यात आता इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उताराचा फटका भारतीयांच्या खिशालाही बसू लागला आहे.
advertisement
2/6
पुण्यापाठोपाठ नागपुरातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तुम्ही टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचं प्रत्येक लीटरमागे बजेट कोलमडणार आहे. नागपूरमधील एचपी कंपनीच्या पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे उच्च क्षमतेच्या गाड्या वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
advertisement
3/6
नागपुरात यापूर्वी पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.६३ रुपये इतका होता. मात्र, ताज्या दरवाढीनंतर हा आकडा आता ११३.७२ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तूर्तास मोठी वाढ झालेली नसली, तरी त्या स्थिर आहेत. सध्या नागपुरात साध्या पेट्रोलचा भाव १०४ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर ९०.५६ रुपये इतका आहे.
advertisement
4/6
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. याच जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 'प्रीमियम' इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
5/6
आधीच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले होते, त्यातच आता पेट्रोलच्या या दरवाढीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. "पॉवर पेट्रोल महागल्यामुळे गाडी चालवणे आता चैनीचे झाले आहे.
advertisement
6/6
इंधन आणि गॅस या दोन्ही जीवनावश्यक गोष्टी महागल्याने महिन्याचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे," अशी प्रतिक्रिया नागपुरातील एका सामान्य ग्राहकाने व्यक्त केली आहे. पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये झालेली ही दरवाढ पाहता, आगामी काळात इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारची दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nagpur Petrol Price: पुण्यानंतर आता नागपुरात वाढलं पेट्रोल, टाकी फुल्ल करण्याआधी चेक करा नवे दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल