नवी कार खरेदी करणाऱ्यांनो लक्ष द्या! 'या' चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवी कोरी कार खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण ती खरेदी केल्यानंतर लोक अनेक चुका करतात. या चुका कोणत्या आहेत आणि का टाळाव्यात पाहूया...
advertisement
1/6

मुंबई : आपली स्वतःचं कार असावी अशी सर्वांचिच इच्छा असते. अनेकजण सेकंड हँड ऑप्शन निवडतात. तर काही लोकांना नवी कोरीच कार हवी असते. पण कार खरेदी केल्यावर लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पुढे चालून मोठं नुकसान होतं. आज आपण अशाच काही चुकांविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
पहिली सर्व्हिसिंग : आपण नवी कार खरेदी करतो, तेव्हा त्याची पहिली सर्व्हिसिंग होत नाही तोपर्यंत कार योग्य प्रकारे चालवायला हवी. कारची फर्स्ट सर्व्हिस वेळेवर करा. असं केल्याने तुमच्या कारला पुढे चालून काही नुकसान होणार नाही. फर्स्ट सर्व्हिसनंतरही तुम्ही बाकीच्या सर्व्हिस वेळेवर केल्या पाहिजे.
advertisement
3/6
जास्त एक्सीलरेटर देणे टाळा : आपण अनेकदा पाहतो की, लोक नव्या कारमध्ये विनाकारण एक्सिलरेट देतो. ज्यामुळे इंजिनवर परिणाम होतो. सोबतच फ्यूलही जास्त लागते. अनेकदा लोक इंजिन बंद करण्यापूर्वीही 2-3 वेळा एक्सिलरेटचा वापर करतात जे इंजिनला नुकसान पोहोचवू शकते. असे करणे टाळा.
advertisement
4/6
ओव्हरलोडिंग करू नका : बूट स्पेस, सामान ठेवण्यासाठी असते. मात्र अनकेदा लोक जास्त सामान ठेवतात. ज्याला ओव्हर लोडिंग म्हणतात. कारमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान ठेवल्याने गाडीचे टायर्स, सस्पेंशन आणि इंजिनवर वाईट परिणाम होतो. सोबतच परफॉर्मेंसवरही वाईट परिणाम होतो.
advertisement
5/6
Towing करू नका : नव्या कारने एखाद्याला टोइंग करणे टाळा. कारण असं केल्याने थेट परिणाम इंजिनवर होतो. कारची सर्व सर्व्हिस झाली असेल तर असं करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो.
advertisement
6/6
यूझर मॅन्युअल बुक अवश्य वाचा : कार वापरण्यापूर्वी त्याची यूझर मॅन्युअल बुक अवश्य वाचा. असं केल्याने तुम्हाला गाडीविषीय खुप माहिती मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने कारचा वापर करू शकाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
नवी कार खरेदी करणाऱ्यांनो लक्ष द्या! 'या' चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान