TRENDING:

Please मदत करा! फरमानशी लग्नानंतर आता घाबरलीये मोनालिसा, 10 दिवसांत भयंकर घडलं

Last Updated:
Kumbha Mela Viral Girl Monalisa Farman : लव्ह जिहाद नाही आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, हिंदू पद्धतीने लग्न केलं असं सांगणारी कुंभमेळा व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेने लग्नाच्या 10 दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
1/7
Please मदत करा! फरमानशी लग्नानंतर आता घाबरलीये मोनालिसा, 10 दिवसांत तिच्यासोबत भयंकर घडलं
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा जी काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. तिने फरमान खानशी लग्न केलं. याला लव्ह जिहाद म्हटलं गेलं. पण दोघांनीही हे लव्ह जिहाद नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. पण आता मोनालिसा खूप घाबरली आहे, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तिने मदत मागितली आहे.
advertisement
2/7
मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांनी 11 मार्च 2026 रोजी लग्न केलं. केरळमध्ये एका मंदिरात हिंदू विधीनुसार त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
advertisement
3/7
मोनालिसाला सिनेक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करणारे आणि तिला फिल्ममध्ये काम करण्याची संधी देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रांसह अनेकांनी मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटलं.
advertisement
4/7
दरम्यान मोनालिसाच्या कुटुंबाने आपल्या मुलीला फसवल्याचं सांगितलं. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला फसवून आपल्या पळवून नेल्याचं सांगितलं.
advertisement
5/7
पण मोनालिसा आणि फरमान या दोघांनी आपण सहा महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम करत असून मोनालिसाचं कुटुंब तिचं लग्न जबरदस्ती दुसरीकडे लावून देत असल्याचं सांगून लग्न केलं.
advertisement
6/7
मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाला 10 दिवस झाले आहेत. दरम्यान आता मोनालिसाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात ती आणि तिचा नवरा फरमान एकत्र दिसत आहेत. फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ आहे.
advertisement
7/7
मोनालिसाने सांगितलं, "आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या व्हिडीओसोबत मेलही पोलीस, सरकार, मीडिया सगळ्यांना पाठवत आहोत. प्लीज आम्हाला मदत करा". आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत दोघांनीही मदत मागितली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Please मदत करा! फरमानशी लग्नानंतर आता घाबरलीये मोनालिसा, 10 दिवसांत भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल