TRENDING:

सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न, तारीख ठरली, कुठं आणि कसा पार पडणार रेवतीचा विवाहसोहळा?

Last Updated:
Supriya Sule Daughter's Marriage: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांचा विवाह सोहळा येत्या २० जून रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.
advertisement
1/7
सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न, तारीख ठरली, कुठं आणि कसा पार पडणार रेवतीचा विवाहसोहळा?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांचा विवाह सोहळा येत्या २० जून रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भव्य विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सध्या दोन्ही कुटुंबांकडून सुरू आहे.
advertisement
2/7
रेवती आणि सारंग यांचा मुख्य विवाह सोहळा मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असला, तरी त्यानंतर होणारे रिसेप्शन सोहळे मात्र अत्यंत दिमाखदार असणार आहेत.
advertisement
3/7
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मुख्य विवाह सोहळा पार पडेल. मुंबईसह अन्य दोन ठिकाणी रिसेप्शन सोहळा पार पडेल. लखानी कुटुंबीय नागपूरचे असल्याने तिथे एक मोठं रिसेप्शन आयोजित केलं जाईल.
advertisement
4/7
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या राजकीय स्नेहामुळे दिल्लीतील दिग्गज नेत्यांसाठी तिथेही एक रिसेप्शन सोहळा आयोजन करण्यात येणार आहे.
advertisement
5/7
सारंग लखानी हे नागपूरमधील प्रसिद्ध उद्योजक आणि 'विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर'चे मालक अरुण लखानी यांचे चिरंजीव आहेत. सारंग यांनी परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण केले असून ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत.
advertisement
6/7
या विवाहामुळे पवार कुटुंबीय आता नागपूरचे व्याही होणार आहेत. विशेष म्हणजे, या सोयरिकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती.
advertisement
7/7
फेब्रुवारी महिन्यातच सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या लग्नाची अधिकृत माहिती दिली होती. आता २० जून ही लग्नाची तारीख निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न, तारीख ठरली, कुठं आणि कसा पार पडणार रेवतीचा विवाहसोहळा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल