मला फोन केला, तेव्हा माझ्या घरी दोन मुली होत्या - ड्वेन ब्रावो
प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी केकेआरची टीम मॅनेजमेंट प्रेस कॉन्फरेन्ससाठी आली. त्यावेळी अभिषेक नायर, शेट वॉर्ट्सन, ड्वेन ब्रावो आणि अजिंक्य रहाणे उपस्थित होते. प्रेस कॉन्फरेन्स सुरू होण्याआधी सर्वांच्या गप्पा चालल्या होत्या. त्याचवेळ ड्वेन ब्रावो शेन वॉटसनशी गप्पा मारत होता. यावेळी ब्रावोने अभिषेक नायर यांच्याकडे इशारा करत म्हटलं, "जेव्हा या लोकांनी मला फोन केला, तेव्हा माझ्या घरी दोन मुली होत्या." आपण प्रेस कॉन्फरेन्सला पोहोचलोय, याचं भान ब्रावोला नव्हतं.
advertisement
सांभाळून बोला माईक चालू आहे
ब्रावो याचं हे विधान कॅमेऱ्यात कैद झालं. कारण तिथं ठेवलेले माईक चालू होते. तिथं शांतपणे येऊन बसलेल्या रहाणेला ही गोष्ट जशी कळाली. त्याने लगेच दोघांना सावध केलं. सांभाळून बोला माईक चालू आहे, असं रहाणे यावेळी म्हणताना दिसतोय. त्यावेळी ब्रावो 'ओ शीट...' असं म्हणताना दिसतोय. आपण बोलल्याचा त्याला प्रश्चाताप झाल्याचं पहायला मिळालं. सध्या सोशस मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
अभिषेक नायर म्हणाला...
केकेआरच्या बॅटिंग ऑर्डरबाबत बोलताना अभिषेक नायर म्हणालं की, "आमच्याकडे रिंकू सिंग आणि अन्शुल रमन सारखे मॅच विनर खेळाडू आहेत, ज्यांनी यापूर्वी स्वतःला सिद्ध केलं आहे. आयपीएलमध्ये खेळताना नेहमीच दडपण असते, पण हे दडपण झुगारून युवा खेळाडूंनी या संधीचं सोनं करावं, अशी आमची इच्छा आहे. केकेआरच्या वारशात आपलं नाव कोरण्यासाठी ही या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे."
आमच्याकडे जागतिक दर्जाचे अनेक पर्याय - वॉटसन
दरम्यान, वॉटसन पुढे म्हणाला, "आमच्या संघाचे सौंदर्य हेच आहे की आमच्याकडे जागतिक दर्जाचे अनेक पर्याय आहेत. हे सर्व खेळाडू नक्की कुठे फिट होतील, हे ठरवणे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. आम्हाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच योग्य कॉम्बिनेशन शोधावे लागेल. कॅमेरून ग्रीनसारख्या दर्जेदार खेळाडूला जिथं कुठं संधी मिळेल, तिथे तो आपला प्रभाव पाडेल याची आम्हाला खात्री आहे."
