तब्बल 7 किलो कमी झालं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचदरम्यान त्याला 'स्प्लीन इंजरी' (प्लीहा दुखापत) झाली होती, ज्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. या गंभीर दुखापतीमुळे त्याचे वजन सुमारे 7 किलो कमी झालं होतं. "दुखापतीनंतर पुनरागमन करणं नेहमीच कठीण असतं, परंतु दोन महिन्यांच्या उपचारानंतर मी पुन्हा फिट झालो," असं श्रेयसने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
advertisement
स्वतःला पुन्हा सिद्ध केलं
घटलेले 7 किलो वजन पुन्हा मिळवण्यासाठी श्रेयसला खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने आव्हानांचा सामना करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं असून, आता तो पुन्हा पंजाब किंग्जला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यर याने अफलातून कामगिरी करत पंजाब किंग्जने फायनलमध्ये पोहोचवलं होतं. अशातच आता त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. गेल्या वेळी उपविजेतेपद मिळाल्यामुळे आता चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, आपले पूर्ण लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असल्याचं श्रेयसने स्पष्ट केलंय.
खेळाडूंची बॉण्डिंग अधिक घट्ट
दरम्यान, मैदानावरील सरावाइतकंच टीम हॉटेलमधील वातावरण महत्त्वाचं असल्याचं कॅप्टन श्रेयसने नमूद केलं. "पुढचे दोन महिने आम्ही एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहणार आहोत. गेम रूममध्ये फिफा सारखे गेम्स खेळल्यामुळे खेळाडूंमधील बॉण्डिंग अधिक घट्ट होते," असंही त्याने यावेळी सांगितलं. मैदानाबाहेरील ही मैत्री मॅचमध्ये चांगले निकाल मिळवण्यासाठी मदत करतं, असा विश्वास श्रेयस अय्यरने यावेळी व्यक्त केला.
