Youtube premium lite सब्सक्रिप्शन लॉन्च! घ्या अॅड फ्री व्हिडिओचा आनंद,किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
युट्यूबने "YouTube Premium Lite" नावाचा एक स्वस्त जाहिरात-मुक्त प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन अशा यूझर्ससाठी आहे ज्यांना जाहिरातींशिवाय व्हिडिओ पहायचे आहेत.
advertisement
1/7

YouTube हे भारतातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. तसंच, YouTube वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे यूझर्सचा व्हिडिओ पाहण्याचा आनंद कमी होतो. पण आता युट्यूबने एक स्वस्त प्लॅन सादर केला आहे, ज्याला युट्यूब लाईट सबस्क्रिप्शन असे नाव देण्यात आले आहे.
advertisement
2/7
हा सर्वात परवडणारा अॅड-फ्री प्लॅन आहे. युट्यूबचा नवीन प्लॅन बुधवार म्हणजेच 5 मार्च 2025 रोजी सादर करण्यात आला आहे. YouTube च्या प्रीमियम लाइट नावाच्या या प्लॅनचा पायलट प्रकल्प सुरू झाला आहे.
advertisement
3/7
Youtube प्रीमियम लाईट प्लॅन सध्या अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत 7.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 695 रुपये प्रति महिना आहे. अमेरिकेनंतर, येत्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या इतर देशांमध्ये ही योजना सुरू केली जाऊ शकते.
advertisement
4/7
गेल्या महिन्यातच, नवीन परवडणाऱ्या YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनच्या लाँचिंगबद्दल माहिती मिळाली. आपण अमेरिकेबद्दल बोललो तर, YouTube च्या अॅड फ्री टियरच्या सुरुवातीची किंमत 13.99 डॉलर आहे, जी दरमहा अंदाजे 1,200 रुपये आहे. तसंच, हा प्लॅन भारतात सुरू होईल की नाही? सध्या याबद्दल कोणतीही माहिती नाही, कारण भारत आणि अमेरिकेतील किंमत वेगळी आहे.
advertisement
5/7
आपण भारताबद्दल बोललो तर, येथे YouTube चा प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन प्रति महिना 149 रुपयांना येतो. हा एक इंडिविजुअल प्लॅन आहे. YouTube चा मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन 159 रुपयांना येतो, तर YouTube चा 3 महिन्यांचा प्लॅन 459 रुपयांना येतो.
advertisement
6/7
YouTube Premium Lite प्लॅनचा अर्थ असा की, या प्लॅनमध्ये YouTube Premium प्लॅनच्या तुलनेत कमी फीचर्स असतील. या प्लॅनमध्ये YouTube व्हिडिओंचे अॅड-फ्री स्ट्रीमिंग उपलब्ध आहे, परंतु हा प्लॅन YouTube Music सबस्क्रिप्शनशिवाय येईल. म्हणजे तुम्ही अॅड-फ्री म्यूझिक आणि म्यूझिक व्हिडिओ स्ट्रीम करू शकणार नाही.
advertisement
7/7
युट्यूबचा नवीन प्रीमियम लाईट प्लॅन : यूट्यूबच्या मते, यूजर्स अ‍ॅपवर जाहिरातींसह ट्रॅक ऐकू शकतात, परंतु त्यांना ऑफलाइन ऐकण्यासाठी बॅकग्राउंड प्ले आणि म्यूझिक डाउनलोड सारखे फीचर्स मिळणार नाहीत. YouTube चा नवीन प्रीमियम लाईट प्लॅन अॅड फ्री स्ट्रीमिंग ऑफर करेल. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत. YouTube च्या मते, यूझर्स कंटेंट शोधत असताना आणि ब्राउझ करत असताना म्यूझिक कंटेंट आणि शॉर्ट्सवर जाहिराती दिसू शकतात. रिपोर्टनुसार, सध्या YouTube चे एकूण 125 मिलियन सबस्क्राइबर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Youtube premium lite सब्सक्रिप्शन लॉन्च! घ्या अॅड फ्री व्हिडिओचा आनंद,किंमत किती?