GK : जगाच्या नकाशावरील हे सिक्रेट तुम्हाला माहितीये का? असा देश जो 10-20 नव्हे, तर तब्बल 14 देशांशी शेअर करतो सीमा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जगाच्या नकाशावर असे काही देश आहेत, ज्यांच्या सीमा एका बाजूला बर्फाळ प्रदेशाला स्पर्श करतात, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगलांना. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील असे कोणते देश आहेत ज्यांना सर्वाधिक शेजारी लाभले आहेत?
advertisement
1/7

आपण घर घेताना नेहमी पाहतो की आपले शेजारी कोण आहेत. चांगले शेजारी असले की सुख-दु:खात साथ मिळते आणि सण-उत्सवही आनंदाने साजरे होतात. पण जर शेजारी चांगले नसतील तर मात्र याच गोष्टी दु:खात बदलतात. असंच काहीसं देशांच्याबाबतीत देखील होतं. जर शेजारी देश चांगले असतील तर मात्र सगळं शांत रहातं, पण शेजारी देशामुळे आपल्याला धोका असेल तर मात्र कधीकधी देशात असंतोष राहातं. शेजारी देशांची संख्या जितकी जास्त, तितकीच जबाबदारी आणि सुरक्षेची आव्हानेही मोठी असतात.
advertisement
2/7
जगाच्या नकाशावर असे काही देश आहेत, ज्यांच्या सीमा एका बाजूला बर्फाळ प्रदेशाला स्पर्श करतात, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगलांना. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील असे कोणते देश आहेत ज्यांना सर्वाधिक शेजारी लाभले आहेत? चला तर मग, भूगोल आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या या रंजक सफरीवर जाऊया.
advertisement
3/7
रशिया आणि चीन: सीमांचे 'विश्वविक्रम'जगातील सर्वाधिक देशांशी सीमा सामायिक करण्याचा विक्रम रशिया आणि चीन या दोन बलाढ्य देशांच्या नावावर आहे. हे दोन्ही देश प्रत्येकी 14 देशांशी आपली भू-सीमा (Land Border) शेअर करतात.
advertisement
4/7
चीन (China): आशिया खंडावर वर्चस्व गाजवणारा चीन उत्तर दिशेला मंगोलिया आणि रशियापासून सुरू होऊन पूर्व दिशेला उत्तर कोरियापर्यंत पसरला आहे. दक्षिण-पूर्वेला व्हिएतनाम, लाओस, म्यानमार तर दक्षिण आशियात भारत, भूतान, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांशी चीनची सीमा जोडलेली आहे. चीनची एकूण भू-सीमा तब्बल 22,000 किलोमीटर लांब आहे.
advertisement
5/7
रशिया (Russia): क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश असलेला रशिया दोन खंडांत (युरोप आणि आशिया) विस्तारलेला आहे. पश्चिमेकडे नॉर्वे, फिनलंडपासून ते युक्रेनपर्यंत आणि दक्षिणेकडे जॉर्जिया, कझाकस्तानपासून थेट उत्तर कोरियापर्यंत रशियाच्या सीमा भिडल्या आहेत.
advertisement
6/7
ब्राझील आणि काँगो: दुसऱ्या क्रमांकाचे दावेदारया यादीत दक्षिण अमेरिकेतील ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर येतो. ब्राझीलची सीमा 10 देशांशी लागून आहे. विशेष म्हणजे, इक्वाडोर आणि चिली सोडले तर दक्षिण अमेरिकेतील जवळपास सर्वच देशांशी ब्राझीलची सीमा जोडलेली आहे. दुसरीकडे, आफ्रिका खंडात काँगो लोकशाही प्रजासत्ताक (DRC) हा देश 9 शेजारी देशांसह आघाडीवर आहे. युरोपमध्ये जर्मनी देखील 9 देशांशी आपली सीमा सामायिक करतो.
advertisement
7/7
अनेक शेजारी असण्याचे फायदे आणि तोटेजेव्हा एखाद्या देशाच्या सीमा अनेक देशांना जोडलेल्या असतात, तेव्हा त्याचे दोन पैलू असतात. जितके जास्त शेजारी देश, तितकी व्यापारासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. रस्ते आणि रेल्वे मार्ग विकसित करून आर्थिक संबंध मजबूत करणे सोपे जाते. चीन आणि रशियासारख्या देशांसाठी इतकी मोठी सीमा राखणे सोपे नाही. सीमावाद, घुसखोरी, अवैध तस्करी आणि स्थलांतर यांसारख्या समस्यांमुळे या देशांच्या सुरक्षा यंत्रणांवर नेहमीच ताण असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
GK : जगाच्या नकाशावरील हे सिक्रेट तुम्हाला माहितीये का? असा देश जो 10-20 नव्हे, तर तब्बल 14 देशांशी शेअर करतो सीमा