Tejas fighter Crash: मोठा आवाज अन् तेजस फायटर जेट जमिनीकडे झेपावलं, पायलटचं काय झालं? PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
दुबईत सुरू असलेल्या एका एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं एचएएल तेजस हे लढाऊ विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेमध्ये पायलट विमानातून बाहेर पडला की नाही, याबद्दल अद्याप कोणतंही वृत्त समोर आलं नाही.
advertisement
1/8

दुबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुबईत सुरू असलेल्या एका एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं एचएएल तेजस हे लढाऊ विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेमध्ये पायलट विमानातून बाहेर पडला की नाही, याबद्दल सुरुवातीला माहिती समोर आली नाही. मात्र, या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
2/8
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये प्रतिष्ठित 'दुबई एअर शो' मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित करण्यात आला आहे. या एअर शोमध्ये प्रात्याक्षिक सादर सादर करत असताना दुपारी २.१० वाजेच्या सुमारास भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान कोसळलं. सुदैवाने हे लढाऊ विमान एका मोकळ्या जागेत कोसळलं.
advertisement
3/8
टेक ऑफ केल्यानंतर अचानक तेजस विमानामध्ये काही तरी बिघाड झाला आणि विमान तसंच खाली कोसळलं. विमान कोसळल्यांतर मोठा स्फोट झाला.
advertisement
4/8
पण, विमान जेव्हा कोसळत होतं तेव्हा पायलटला एक्झिट करता आलं नाही. त्यामुळे पायलटचा शोध घेतला असता दुर्घटनेत मृत्यू झााल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/8
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
6/8
विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठताना दिसले.
advertisement
7/8
भारताच्या स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची संरक्षण क्षमता दर्शविण्यासाठी दुबई एअर शोमध्ये सहभागी झालं होतं.
advertisement
8/8
यापूर्वीही तेजसच्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या, ज्या भारतीय सरकारने तांत्रिक माहिती देऊन खोट्या ठरवल्या होत्या. मात्र, आता ही दुर्घटना घडल्यामुळे या विमानाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Tejas fighter Crash: मोठा आवाज अन् तेजस फायटर जेट जमिनीकडे झेपावलं, पायलटचं काय झालं? PHOTOS