TRENDING:

बड्या अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचा मृत्यू, स्वत:च कायमचं संपवलं आपलं आयुष्य

Last Updated:
Martin Shorts Daughter : बड्या अभिनेत्या त्याच्या मुलीने जगातून कायमचा निरोप घेतला आहे. आपल्या मुलीला गमावल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं आहे.
advertisement
1/5
बड्या अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचा मृत्यू, स्वत:च कायमचं संपवलं आपलं आयुष्य
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपल्या काळजाचा तुकडा, त्याची मुलगी कायमची गमावली आहे. त्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. तिने स्वत:चं आपलं आयुष्य कायमचं संपवल्याची माहिती आहे. राहत्या घरातच तिचा मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
हा अभिनेता आहे मार्टिन शॉर्ट. ज्याची 42 वर्षांची मुलगी कॅथरीन शॉर्टचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड हिल्समधील राहत्या घरी तिचा मृतदेह सापडला. तिने स्वत:वर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
advertisement
3/5
मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांना हॉलिवूड हिल्स इथं कॅथरीनच्या घरी बोलावण्यात आलं. लॉस एंजेलिस पोलिस विभाग (LAPD) आणि आपत्कालीन पथकं ताबडतोब पोहोचली. त्यांनी तपास केला, तेव्हा कॅथरीन मृत आढळली. तिने स्वतःवर गोळी झाडल्याची पुष्टी त्यांनी केली.
advertisement
4/5
मार्टिन शॉर्ट आणि कुटुंबाने तिच्या मृत्यूबाबत एक निवेदनही जारी केलं. कॅथरीनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. शॉर्ट कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कॅथरीन सर्वांना प्रिय होती आणि तिने या जगात आणलेल्या आनंदी भावनेसाठी ती नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या कठीण काळात तुम्ही सर्वांनी आम्हाला एकांत द्यावा अशी विनंती."
advertisement
5/5
कॅथरीनने तिच्या वडिलांसारखं अभिनय क्षेत्र निवडलं नाही तर ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम कर होती. तिचं स्वतःचं क्लिनिक होतं, तसंच मानसोपचार तज्ज्ञांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका क्लिनिकमध्येही ती पार्ट टाइम काम करत होती. जगाला मानसिक ज्ञान देणाऱ्या कॅथरीनने स्वत:च जीव दिल्याने खळबळ उडाली आहे. यामागील कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बड्या अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचा मृत्यू, स्वत:च कायमचं संपवलं आपलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल