TRENDING:

दिवसाला 2 हजाराचा खर्च, 1500 किलो वजन, 23 कोटींना मागितला तरी दिला नाही, या महाकाय रेड्यात असं काय?

Last Updated:
अजमेर जिल्ह्यातील पुष्करमध्ये सध्या प्राण्यांची यात्रा सुरू आहे. एकाहून एक प्राणी याठिकाणी येत आहेत. लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतही याठिकाणी घोडे येत आहेत. तर यातच आता अनमोल नावाचा रेडा याठिकाणी सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. या विशाल रेड्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. यासोबत अनेक जण फोटो आणि सेल्फीसुद्धा काढत आहेत. याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. (जसपाल सिंग/सिरसा, प्रतिनिधी)
advertisement
1/5
दिवसाला 2 हजाराचा खर्च, 1500 किलो वजन, 23 कोटींना मागितला तरी दिला नाही
राजस्थानच्या पुष्कर येथे भरलेल्या यात्रेत सिरसा येथील रहिवासी जगतार सिंह यांचा 8 वर्षांचा मुराह जातीचा रेडा अनमोल हा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. याची उंची 5 फूट 8 इंच आहे. तर लांबी 13 फूट आणि वजन तब्बल 1500 किलो आहे.
advertisement
2/5
यात्रेत आलेल्या 15 म्हशींचा पराभव करून तो आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बनला आहे. राजस्थान सरकारच्या मंत्र्यांकडून त्याला या यात्रेत सन्मानित केले जाणार आहे. याआधीही अनमोलने अनेक राज्यांमध्ये आयोजित केलेल्या मेळ्यांमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
advertisement
3/5
रेड्याचे मालक हस्सू गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे नाव जगतार सिंह असे आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी हिसार येथील लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातून लस आणली होती. यानंतर 2016 मध्ये अनमोल या रेड्याचा जन्म झाला. त्याची काळजी संपूर्ण कुटुंबीय घेऊ लागले. आता तो 8 वर्षे 2 महिन्याचा आहे. या रेड्याचे वीर्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि इतर राज्यांमधील लोकांनी नेल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
4/5
आतापर्यंत त्याच्या वीर्याने 3 हजार मुले झाली आहेत. अनमोल नावाच्या या रेड्यावर दररोज 2 हजार रुपयांचा जेवणासाठी खर्च येतो. जेवणात त्याला काजू, बादाम, मेवा, केळी, सफरचंद, सोयाबीन, मक्का, हरबरा, हरबऱ्याची चूरी दिली जाते. याच्या देखभालीसाठी डबवलीजवळ डॉ. रूपसिंग यांच्यासह चार जण असतात.
advertisement
5/5
जगतार सिंह यांनी सांगितले की, ते दरवर्षी या यात्रेत भाग घेण्यासाठी येतात आणि आपल्या रेड्याचे प्रदर्शन करतात. यावेळी अनेक खरेदीदार आले. मात्र, त्यांनी आपल्या रेड्याला विकले नाही. त्याचे वीर्य हे 250 रुपयांत विकले जाते. आतापर्यंत त्याला 23 कोटी रुपयांची बोली लागलेली आहेत. मात्र, ते या रेड्याला आपल्या मुलासारखे मानतात. त्यामुळे त्यांना याची विक्री करायची नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
दिवसाला 2 हजाराचा खर्च, 1500 किलो वजन, 23 कोटींना मागितला तरी दिला नाही, या महाकाय रेड्यात असं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल