Dmart मध्ये तुम्ही रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकता का? काय आहे कंपनीची रिटर्न पॉलिसी?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत. चला पाहू या, DMart ची रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिशी कशी आहे आणि ग्राहकांसाठी काय करणं अपेक्षित आहे.
advertisement
1/10

अनेक ठिकाणी लोक DMart मधून महिन्याभराचा किराणा भरतात. इथे कमी किंमतीत आणि स्वस्त:त आपल्याला वस्तू मिळतात. ज्यामुळे गृहिणींना देखील बचत करण्यास मदत होते. पण इथे शॉपिंग करत असताना कधीकधी लोक काही गोष्टींसाठी कन्फ्यूज असतात किंवा काही प्रश्न त्यांच्या मनात येतात. त्यांपैकी एक म्हणजे "ही वस्तू एक्सचेंज/रिटर्न होईल ना?" त्यासाठी काय नियम असतील?
advertisement
2/10
तर आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत. चला पाहू या, DMart ची रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिशी कशी आहे आणि ग्राहकांसाठी काय करणं अपेक्षित आहे.
advertisement
3/10
1. ऑफलाइन स्टोअरमध्ये रिटर्न/एक्सचेंज?DMart च्या नियमित स्टोअर्समध्ये रिटर्न किंवा एक्सचेंज दिला जात नाही. एकदा खरेदी झाल्यानंतर कोणतीही वस्तू परत किंवा बदलली जाऊ शकत नाही.
advertisement
4/10
ग्राहकांच्या काही कॉमन तक्रारी पाहाता असं समोर आलं की ग्राहक एक तर एखादा खाद्यपदार्थ परत करतात किंवा मग डायपर्स सारख्या वस्तू परत करायला येतात. पण स्टोअरकडून ते घेण्यात नाकार दिला जातो, ज्यामुळे ग्राहक निराश झाले आहेत.
advertisement
5/10
2. DMart Ready (ऑनलाइन/Home‑delivery) चे धोरणडिमार्टचे ऑनलाइन घरपोच सेवा म्हणजे DMart Ready, यामध्ये एक वेगळा नियम आहे. रिटर्न केवळ ऑनलाइन खरेदीसाठी, वस्तू 7 दिवसांच्या आत त्या DMart Ready सोर्स किंवा Pick-up point वर परत करता येते.
advertisement
6/10
मात्र, यात एक्सचेंजची सुविधा नाही. जर तुम्हाला बदलायचं असेल तर रिटर्न करून नंतर नवीन ऑर्डर द्यावी लागते. पण यासाठी वस्तू वापरलेली नसावी, ओरिजिनल पॅकिंगसह असावी, व्हाऊचेअरबद्ध बिलासह असावी लागते. या वस्तूचा रिफंड मूळ पेमेंट मोडमध्ये 3–5 कामकाजाच्या दिवसांत होतो .
advertisement
7/10
3. काही वस्तू परत/रिटर्नसाठी अपात्रताजे खाद्यपदार्थ (फळ, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ). तसेच अंडरगार्मेंट्स, सॉक्स, सॉकस, कास्मेटिक्स, सणाशी संबंधीत वस्तू, bulk स्वरूपाच्या खरेद्या तसेच इतर काही वस्तू रिटर्न होत नाहीत. याची सविस्तर यादी DMart Ready वेबसाइटवर आहे.
advertisement
8/10
डिमार्टमधून खरेदी करताना या गोष्टीं लक्षात ठेवाबिल किंवा त्याचीरसीद सुरक्षित ठेवा, वस्तूंचं पॅकिंग तपासा. तसेच रेफंडसाठी 7 दिवसांची मर्यादा लक्षात ठेवा. म्हणजे काही परत करायचं असेल तर परत करा.
advertisement
9/10
DMart मध्ये नियमित स्टोअर्समध्ये रिटर्न/एक्सचेंज नव्हे, DMart Ready नेटवर्कमध्ये मात्र केवळ रिटर्न (बदल नाही) आणि 7 दिवसांच्या आत रिफंड शक्य आहे. हे नियम लक्षात ठेवा.
advertisement
10/10
तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असल्यास, DMart Ready च्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dmart मध्ये तुम्ही रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकता का? काय आहे कंपनीची रिटर्न पॉलिसी?