TRENDING:

देशात असंख्य पक्षी, पण मोरालाच का एवढा मान? फक्त सौंदर्य नाही, खरं कारण त्याहून खास!

Last Updated:
Peacock National Bird: अत्यंत देखणा, सुरेख रंगसंगतीचा मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. भारत सरकारनं 26 जानेवारी 1963 रोजी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं. तुम्हाला माहितीये का, यामागे केवळ मोराचं अद्वितीय सौंदर्य नाही, तर मोराचे विविध वैशिष्ट्य आहेत. ते नेमके काय जाणून घेऊया. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
1/5
देशात असंख्य पक्षी, मोरालाच का एवढा मान? फक्त सौंदर्य नाही, खरं कारण त्याहून खास
इंडियन बर्ड कंजर्व्हेशन नेटवर्कचे डॉ. सत्यप्रकाश यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, भारतीय संस्कृतीत मोराला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मोराचा विशेष उल्लेख आढळतो. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावरही मोरपंख शोभून दिसतो. भगवान कृष्ण ज्याप्रकारे बासरी वाजवून गोपिकांना आकर्षित करतात, अगदी त्याचप्रमाणे मोर पावसात पिसारे फुलवून नृत्य करतात. तेव्हा लांडोर त्यांच्याप्रति आकर्षित होते. एवढंच नाही, तर भगवान कार्तिकेयचं वाहनही मोर आहे.
advertisement
2/5
मोराला भारताची शान मानतात. भारताच्या जवळपास प्रत्येक भागात मोर आढळतात. राजस्थानच्या महलांपासून दक्षिण भारतातील जंगलांपर्यंत सर्वत्र मोराचं सौंदर्य पाहायला मिळतं. म्हणूनच संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्त्व करणारा असा हा पक्षी मानला जातो.
advertisement
3/5
डॉ. सत्यप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजनन काळात जेव्हा मोराकडे आकर्षित होऊन कित्येक लांडोर येतात, तेव्हा त्यापैकी केवळ 1 किंवा दोघींशी त्याचे संबंध प्रस्थापित होतात. तर, प्रजनन काळ संपताच मोर आणि लांडोर एकमेकांपासून वेगळे होतात. लांडोर आपल्या अंड्यांची देखभाल एकटीच करते. असं नातं इतर पक्ष्यांमध्ये क्विचितच पाहायला मिळतं.
advertisement
4/5
मोर केवळ दिसायला सुंदर दिसत नाही, तर कित्येक विषारी किडे आणि सापांचा तो शिकारी असतो. गावांमध्ये मोराला नैसर्गिक किटकनाशक मानतात. तो शेतांमधील हानीकारक किटकही नष्ट करतो. परिस्थिती संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा असा हा पक्षी मानला जातो.
advertisement
5/5
असं म्हणतात की, मौर्य काळापासूनच भारतीय संस्कृतीत मोराला विशेष महत्त्व आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात मोराला शाही पक्षी मानलं जात होतं. आजही भारतीय कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रात मोराला विशेष स्थान दिलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
देशात असंख्य पक्षी, पण मोरालाच का एवढा मान? फक्त सौंदर्य नाही, खरं कारण त्याहून खास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल