कसं ओळखायचं केमिकलने पिकवलेले आंबे? 'या' 4 ट्रिक्स ठरतील कामाच्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फळांचा राजा बाजारात विकायला आला आहे. लोकांना आता त्या आंबा खाण्याची ओढ लागली आहे. कोकणच्या मेव्यामध्ये आंब्याचं सर्वोत्तम स्थान आहे.
advertisement
1/10

बहुतेकदा असं होतं की आर्टिफिशल किंवा पावडर लावून पिकवलेले आंबे देखील बाजारात विक्रीसाठी येतात. पैसे कमावण्याच्या नादात विक्रेते असा प्रकार करतात. पण या मुळे अंब्याची मुळ चव किंवा क्वालिटी चांगली रहात नाही. त्यामुळे लोकांना खऱ्या आंब्याची चव चाखता येत नाही.
advertisement
2/10
शिवाय हे आंबे केमिकलमध्ये पिकवलेले असल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मग अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की आता हे केमिकल किंवा पावडर युक्त आंबे कसे ओळखायचे?
advertisement
3/10
आंबे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइडचा वापर केला जातो. ज्याला 'मसाला' असं देखील म्हणतात. पण FSSAI'S ने आशा आंब्याच्या विक्रीवर 2011 पासून बंदी घातली आहे.
advertisement
4/10
याच्या वापरामुळे वेगवेगळे आजार जसे डायरिया, मेमरी लॉस, उलट्या होणे, डोकं दुखणे सारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे त्याच्या पासून लांब राहिलेलं केव्हा ही चांगलंच.
advertisement
5/10
त्यामुळे आता बाजारात येणाऱ्या आंब्यांपैकी केमिकलयुक्त आंबे आणि नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे ओळखणं गरजेचं आहे. ते कसं ओळखायचं याच्या काही ट्रिक्स जाणून घ्या.
advertisement
6/10
बकेट किंवा बादली परीक्षाआंबे पाण्याने भरलेल्या बादलीत टाका. जर आंबे तळाला गेले तर ते नैसर्गिक पद्धतीने पिकवेले गेलेले आहेत असं समजा. पण जर ते पाण्यावर तरंगले तर याचा अर्थ त्यांना पिकवण्यासाठी केमीकलचा वापर केले गेला आहे असं समजा.
advertisement
7/10
रंग तपासाकेमिकल पद्धतीने पिकवल्या गेलेल्या आंब्याचा रंग हा हिरवा-पिवळा असतो. हा रंग एकमेंकांपासून पूर्णपणे वेगळा असतो. नैसर्गिक रित्या पिकवलेला आंबा हा एकाच वेळी पिकतो.
advertisement
8/10
आंबा कापणेआंबा कापल्यावर त्याचा आतला रंग त्याच्या सालीच्या रंगापेक्षा पूर्ण वेगळा असेल तर तो केमिकलने पिकवलेला आंबा आहे आणि जर आंब्याचा रंग एकसारखा आणि सालीच्या रंगाच्या मिळताजुळता असेल तर तो नैसर्गिक रित्या पिकलेला आंबा आहे.
advertisement
9/10
स्पॉट ओळखानैसर्गिक रित्या पिकवलेल्या आंब्यावर ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाचे स्पॉट्स असतात, तर केमिकलने पिकवलेल्या आंब्यावर सफेद मार्क असतात. पण जर तुम्हाला निळ्या रंगाचे स्पॉट असलेला आंबा दिसला, तर त्याला कधीही खरेदी करु नका.
advertisement
10/10
केमीकल फ्री आंबे हे नेहमी ज्युसी किंवा रसाळ असतात. तेच केमिकल युक्त आंब्यात फारसा रसाळपणा आढळत नाही.