TRENDING:

iphone 17: थोड्याच वेळात येतोय सगळ्या फोनचा 'दादा', Apple Event 2025 इथं पाहा LIVE

Last Updated:

मोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी असलेली  ॲपल आता थोड्याच वेळात आपला नवीन Iphone 17 सह इतर मॉडेल्स लाँच करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी असलेली  ॲपल आता थोड्याच वेळात आपला नवीन Iphone 17 सह इतर मॉडेल्स लाँच करणार आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात  ॲपल आपली उत्पादन लाँच करत असते. आज मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ॲपल एका मोठ्या कार्यक्रमात नवीन उत्पादन लाँच करणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं iphone 17 च्या लाँचकडे लक्ष लागलं आहे.
News18
News18
advertisement

ॲपल Event कुठे पाहायचा? 

हा कार्यक्रम अमेरिकेतील क्यूपर्टिनो इथं आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात रात्री १०:३० वाजता सुरू होईल. तुम्ही ते ॲपलच्या वेबसाइट, यूट्यूब चॅनेल आणि ॲपलच्या टीव्ही ॲपवर पाहू शकता. कार्यक्रम संपल्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग देखील उपलब्ध असेल. LIVE पाहण्यासाठी इथं क्लिक करा - Apple Event 2025: 

advertisement

Apple काय आणणारी नवीन? 

iPhone 17 सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लाँच करण्याची शक्यता आहे. हा आयफोन आता iPhone 17 Air जुन्या प्लस मॉडेलची जागा घेईल. Apple च्या स्मार्टफोन लाइनअपमध्ये हा एक मोठा बदल असेल. याशिवाय Apple Watch Ultra 3, Apple Watch Series 11, Watch SE 3 आणि AirPods Pro 3 देखील लाँच केले जाऊ शकते.

advertisement

iPhone 17 कसा असेल? 

iPhone 17 मध्ये 6.3-इंच स्क्रीन, 24-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि जांभळा आणि हिरवा असे नवीन रंग असू शकतात. iPhone 17 Pro मध्ये नवीन कॅमेरा डिझाईन, हलकी बॉडी आणि स्टोरेज 256GB पासून सुरू होऊ शकते. त्याच वेळी, iPhone 17 Pro Max मध्ये मोठ्या बॅटरीसह फोनची रुंदी वाढवली जाईल.

advertisement

आयफोन १७ Air हा सर्वात पातळ मॉडेल असेल, ज्याची जाडी फक्त ५.५ मिमी असल्याचं म्हटलं जातं. यात ६.६ इंचाची स्क्रीन आणि एकच कॅमेरा असेल.

हे देखील होईल लाँच

Apple Watch Ultra 3 मध्ये जलद चार्जिंग, ५G, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि मोठी स्क्रीन असू शकते. वॉच सिरीज ११ मध्ये किरकोळ अपग्रेड असतील आणि वॉच SE ३ मध्ये मोठा डिस्प्ले असेल. AirPods Pro 3 मध्ये नवीन H3 चिप, पातळ केस, लहान इअरबड्स आणि टच कंट्रोल्स असण्याची अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iphone 17: थोड्याच वेळात येतोय सगळ्या फोनचा 'दादा', Apple Event 2025 इथं पाहा LIVE
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल