TRENDING:

Indian Railway : तिकिटासाठी दिले 500 रुपये, महिला क्लर्कनं केलं असं काही की प्रवाशाची उडाली झोप

Last Updated:
मुद्दा नेमका काय होता? हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले. कारण, रेल्वे स्टेशनवरील हा प्रकार प्रवाशांच्या धक्कादायक अनुभवाशी संबंधित आहे.
advertisement
1/8
तिकिटासाठी दिले 500 रुपये, महिला क्लर्कनं केलं असं काही की प्रवाशाची उडाली झोप
अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे आणि तिचा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल आहे. देशाच्या उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम अशा टोकापर्यंत काही क्षणांतच हा व्हिडिओ जंगलात लागलेल्या आगीसारखा पसरला आणि त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
advertisement
2/8
मुद्दा नेमका काय होता? हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले. कारण, रेल्वे स्टेशनवरील हा प्रकार प्रवाशांच्या धक्कादायक अनुभवाशी संबंधित आहे.
advertisement
3/8
तिकिट घेण्यासाठी तिकिट काउंटरवर उभं असताना एका प्रवाशाने तिकीट घेण्यासाठी काउंटरवर रांगेत उभं राहताच अनपेक्षित प्रसंग घडला. त्यानंतर त्याची आणि महिला तिकीट क्लर्कची जोरदार बाचाबाची झाली. प्रवाशाने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि ती सोशल मीडियावर टाकताच व्हिडिओ व्हायरल झाला.
advertisement
4/8
व्हायरल झालेल्या 37 सेकंदांच्या या क्लिपमध्ये प्रवासी आरोप करताना दिसतो की त्याने 500 रुपयांची नोट दिली होती, मात्र बदल्यात त्याला फक्त 320 रुपयेच मिळाले. प्रत्यक्षात त्याला 420 रुपये मिळायला हवेत, पण महिला क्लर्कने 420 रुपये दिल्याचा दावा केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद रंगला.
advertisement
5/8
याशिवाय त्याच व्हिडिओत प्रवासी सांगतो की, दुसऱ्या एका व्यक्तीलाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं. त्याने 100 रुपयांची नोट दिली होती पण त्याला परतावा फक्त 50 रुपयांचा मिळाला.
advertisement
6/8
महिला क्लर्कचा याबाबत काही प्रवाशांशी आणि सहकाऱ्यांशीही वाद सुरू असल्याचं त्या क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला येतं. तर दुसरीकडे, प्रवासी महिला क्लर्कवर कठोर कारवाई करण्याची धमकी देतो.
advertisement
7/8
संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड करून प्रवाशाने सोशल मीडियावर टाकला आणि हा व्हिडिओ काही तासांतच वेगाने व्हायरल झाला. @yabhishek0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्शनमध्ये प्रवाशाने असा दावा केला की, तिकीट काउंटरवरील महिला कर्मचारी प्रवाशांना मुद्दाम कमी पैसे परत देत आहेत आणि जर कोणी विरोध केला तर त्यांना काउंटरबाहेर हाकलून दिलं जातं.
advertisement
8/8
भारतीय रेल्वेकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, न्यूज़18 मराठीने या घटनेची सत्यता पडताळलेली नाही. पण या घटनेने सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : तिकिटासाठी दिले 500 रुपये, महिला क्लर्कनं केलं असं काही की प्रवाशाची उडाली झोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल