खरंच? एअर होस्टेस झाल्यावर लग्न करता येत नाही? काय आहेत एअर लाइन्सचे नियम आणि अटी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air hostess marriage rule : शक्यतो एअर होस्टेस तरुण आणि अविवाहित असतात. एअर होस्टेस लग्न करू शकत नाहीत किंवा लग्न झाल्यावर एअर होस्टेस होता येत नाही, असं अनेकांना वाटतं.
advertisement
1/8

मला एअर होस्टेस व्हायचंय, असं स्वप्न कित्येक तरुणींचं असतं. एअर होस्टेस बनण्यासाठी विशेष शिक्षण, प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. तसंच त्यासाठी शारीरिक पात्रता, कम्युनिकेशन स्किल, वयोमर्यादा आदी गोष्टी महत्त्वपूर्ण असतात.
advertisement
2/8
एअर होस्टेस बनण्यासाठी इयत्ता 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उत्कृष्ट संवाद कौशल्य, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावं. विदेशी एअरलाइन्समध्ये काम करायचं असेल, तर परकीय भाषादेखील अवगत असावी.
advertisement
3/8
एअर होस्टेस बनण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 17 तर कमाल वय 26 वर्ष असावं. हा नियम प्रत्येक एअर लाइन्स कंपनी आणि देशांमध्ये वेगवेगळा आहे. काही कंपन्या 30 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या एअर होस्टेसनाही नोकरीवर ठेवतात.
advertisement
4/8
एअर होस्टेसची नियुक्ती करताना काही भौतिक गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. नोकरी ग्लॅमरस असल्याने लूकला महत्त्व दिलं जातं. तसंच उंची योग्य आहे की नाही, हेदेखील पाहिलं जातं. त्यासाठी एअर होस्टेसची उंची किमान पाच फूट दोन इंच किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
advertisement
5/8
शक्यतो एअर होस्टेस तरुण आणि अविवाहित असतात. एअर होस्टेस लग्न करू शकत नाहीत किंवा लग्न झाल्यावर एअर होस्टेस होता येत नाही, असं अनेकांना वाटतं.
advertisement
6/8
प्रत्येक एअर लाइन्स कंपनीचे वेगवेगळे नियम असतात. त्यात आधी लग्नासंबंधी अटही होती. एअर होस्टेस विवाहित नसण्याची ही अट. काही कंपन्या एअर होस्टेसला चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्यास परवानगी देतात.
advertisement
7/8
एअर इंडियातही असा रूल होता. माहितीनुसार एअर इंडिया आणि नर्गेस मिर्झा प्रकरणात अशा नियमांना असंवैधानिक आणि अधिकारांचं उल्लंघन मानलं.
advertisement
8/8
तेव्हापासून भारतात एअर लाइन्स कंपन्या एअर होस्टेसच्या लग्नाशी संबंधित नियम बनवत नाही. एअर होस्टेस लग्न करू शकतात आणि लग्न झालेल्या महिलाही एअर होस्टेस बनू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
खरंच? एअर होस्टेस झाल्यावर लग्न करता येत नाही? काय आहेत एअर लाइन्सचे नियम आणि अटी?