TRENDING:

Jain Monk Lifestyle : जैन साधू-साध्वी कधीच करत नाहीत अंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?

Last Updated:
जैन धर्मात साधू आणि साध्वी कठोर आणि शिस्तबद्ध जीवन जगतात. दीक्षा घेतल्यानंतर ते कधीही स्नान करत नाही. तरीही तुम्ही त्यांना नेहमी स्वच्छ आणि ताजंतवानं पाहाल. 
advertisement
1/6
जैन साधू-साध्वी कधीच करत नाहीत अंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन पंथ आहेत. दोन्ही पंथातील साधू-साध्वी दीक्षा घेतल्यानंतर कठोर जीवन जगतात. ते सर्व प्रकारच्या भौतिक साधनांचा त्याग करतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन अत्यंत साधेपणाने जगतात. शिस्तबद्ध जीवन जगतात.
advertisement
2/6
जैन पंथातील साध्वी साडीच्या रूपात पांढरे वस्त्र परिधान करतात. प्रचंड थंडीतही ते असेच कपडे घालतात. पण दिगंबर साधू कपडेही घालत नाहीत, बर्फाळ थंडीतही कोणत्याही परिस्थितीत कपडे घालत नाहीत. श्वेतांबर साधू आणि साध्वी देखील त्यांच्याजवळ ठेवलेल्या 14 वस्तूंपैकी एक घोंगडी ठेवतात, जी खूप पातळ असते, ते  ती झोपतानाच घेतात.
advertisement
3/6
हे सर्व लोक कोणताही ऋतू असो,जमिनीवर झोपतात. ते चटईवरही झोपू शकतात. ते झोपण्यासाठी सुकं गवतही वापरतात. मात्र यांची झोप फारच कमी असते. 
advertisement
4/6
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दीक्षा घेतल्यानंतर हे लोक कधीही स्नान करत नाहीत. असं मानलं जातं की जर त्यांनी आंघोळ केली तर सूक्ष्मजीवांचं जीवन धोक्यात येईल. त्यामुळे ते आंघोळ करत नाहीत आणि नेहमी तोंडावर कापड ठेवतात जेणेकरून तोंडातून कोणतेही सूक्ष्मजीव शरीरात पोहोचू नये.
advertisement
5/6
मग ते स्वच्छ कसे राहतात. माहितीनुसार त्यांची अंघोळ मुख्यतः दोन प्रकारची असते - बाह्य आणि अंतर्गत. सामान्य लोक पाण्याने आंघोळ करतात. परंतु जैन साधू-साध्वी आंतरिक स्नान करतात, म्हणजे ध्यानात बसून, मन आणि विचार शुद्ध करतात. त्यांच्यासाठी अंघोळ करणं म्हणजे भावनांचं शुद्धीकरण. त्याचं पालन ते आयुष्यभर करतात.
advertisement
6/6
काही दिवसांनी ओल्या कापडाने ते आपलं शरीर पुसून घेतात. यामुळे त्यांचं शरीर नेहमी ताजे आणि शुद्ध दिसते. (सर्व फोटो सौजन्य - जैन समाज)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Jain Monk Lifestyle : जैन साधू-साध्वी कधीच करत नाहीत अंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल