Indian Railway : ट्रेनमधील बाजूच्या सीटवर 2 लोक असतील तर वर असलेला प्रवाशानं कुठे बसायचं? RAC चे नियम प्रवासापूर्वी माहित असायलाच हवेत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian Railway: आज आम्ही तुम्हाला रेल्वेचे नियम सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील भीती गायब होईल आणि RAC चे नियम देखील लक्षात येतील.
advertisement
1/9

भारतातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवास करणं पसंत करतात. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो. शिवाय कमी वेळेत आणि कमी पैशांत आपल्याला आपल्या इच्छीत स्थळी पोहोचवतो. पण रेल्वेनं आरामदायी प्रवास करण्यासाठी आपल्याला दोन महिने आधी तिकिट काढावं लागतं. तरच तिकिट कन्फर्म मिळते.
advertisement
2/9
पण कधीकधी असं होतं की प्रवाशांना आरएसी सीट मिळतात. अनेकांना या सीटची काळजी वाटते. त्यांना असे वाटते की कोणीतरी त्यांना इथून उठवेल. तसेच याचे नियम नीट माहित नसल्यामुळे फसवणूक होते. रात्री झोपायला त्रास होईल इत्यादी. पण आज आम्ही तुम्हाला रेल्वेचे नियम सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील भीती गायब होईल आणि RAC चे नियम देखील लक्षात येतील.
advertisement
3/9
दोन RAC प्रवासी खालच्या बाजूला बसले आहेत असे समजू. आता वर असलेल्या व्यक्तीला खाली असलेल्या सीटवर बसायचे असेल तर त्यासाठी काय नियम आहे?
advertisement
4/9
भारतीय रेल्वेचे माहिती आणि प्रचार विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, आरएसी सीटवर दोन लोक बसतात. ते दिवसा बसून प्रवास करू शकतात आणि रात्री पाय पसरून झोपायला हरकत नाही. बाजूच्या वरच्या सीटवरचा प्रवासी दिवसा खालच्या सीटवर बसू शकतो. पण रात्री झोपताना त्याला सीट रिकामी करावी लागेल.
advertisement
5/9
रेल्वे नियमावलीनुसार, ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असते. यावेळी, बाजूच्या वरच्या सीटवरील प्रवाशाला खालच्या सीटवर बसता येणार नाही. जर त्याने बसण्याचा आग्रह धरला तर टीटीईकडे तक्रार करता येईल. TTE त्याला जागेवरून काढून टाकेल.
advertisement
6/9
आरएसी RAC म्हणजे काय : आरएसी म्हणजे रद्दीकरणाविरुद्ध आरक्षण (Reservation Against Cancelation) . प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास आरएसी प्रवाशाचे तिकीट कन्फर्म होईल. मात्र तसे होईपर्यंत प्रवाशांना बाजूला असलेल्या सीटच्या खालच्या अर्ध्या भागात बसून प्रवास करावा लागणार आहे.
advertisement
7/9
सहसा, आरएसी जागा दोन लोकांना दिल्या जातात. जर एखाद्या प्रवाशाने त्याचे कन्फर्म केलेले तिकीट रद्द केले, तर RAC मधील पहिल्या प्रवाशाला ती कन्फर्म सीट मिळते आणि दुसरा प्रवासी संपूर्ण आरएसी सीटवर प्रवास करू शकतो.
advertisement
8/9
12 ते 14 RAC प्रवाशांना एका डब्यात सामावून घेतले जाते: एका डब्यात RAC मध्ये 12 ते 14 प्रवासी बसवले जातात. हा क्रमांक थर्ड एसी आणि स्लीपरसाठी आहे. मात्र, हे सर्व कोचमधील बर्थच्या संख्येवर अवलंबून असते.
advertisement
9/9
ICF कोच आकाराने लहान असतात. परिणामी, बर्थची संख्या सहसा कमी असते. दुसरीकडे, एलएचबी कोच मोठे आहेत. आणखी बर्थ आहेत. तथापि, प्रत्येक कोचमध्ये अंदाजे 6 ते 7 बर्थ आरएसीसाठी राखीव आहेत. त्यामध्ये प्रवासीही आरामात प्रवास करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : ट्रेनमधील बाजूच्या सीटवर 2 लोक असतील तर वर असलेला प्रवाशानं कुठे बसायचं? RAC चे नियम प्रवासापूर्वी माहित असायलाच हवेत