बापरे! 6 महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात वाढत होती जुळी मुलं; पाहून डॉक्टरही शॉक
- Published by:Priya Lad
Last Updated:
जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा काही दिवसांनी आईला त्याच्या डोक्यावर एक विचित्र खूण दिसली. जेव्हा त्यामागचं सत्य समोर आलं तेव्हा आईसह डॉक्टरांनाही धक्का बसला.
advertisement
1/7

मुलं जन्माला येतात तेव्हा त्यांच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांची तपासणी केली जाते. त्यांच्यात काही समस्या तर नाही ना हे पाहिलं जातं. ब्रिटनमधील एका महिलेला तिच्या बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याच्या डोक्यावर विचित्र खूण दिसली. 6 आठवड्यांचं हे बाळ. क्लेअर असं तिचं नाव.
advertisement
2/7
आईने तिची मुलगी क्लेअरच्या डोक्यावर क्रॉसची खूण पाहिली. मानेपासून कपाळापर्यंत आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत एक लाइन होती.
advertisement
3/7
घाबरलेल्या आईने तिला रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये नेलं. ती जन्मखूण नव्हती. डॉक्टरांना ती गाठ वाटली, पण तेसुद्धा नव्हतं.
advertisement
4/7
मिररच्या रिपोर्टनुसार, तिथले न्यूरोसर्जन फरहाद अफशर यांना मेंदूला दोन भागांमध्ये सूज आल्याची खूण आढळून आली. मुलीची ताबडतोब तपासणी करण्यात आली आणि समोर आलेलं कारण अत्यंत भयानक होते.
advertisement
5/7
हा ट्यूमर सामान्य नव्हता, पेशी, चरबी आणि हाडांचा बनलेला होता. डॉक्टरांनी घाईघाईने मुलीचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/7
जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. खरं तर, मुलीच्या डोक्यात जुळी मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. तिचेच भाऊ आणि बहीण तिच्या डोक्यात वाढत होते.
advertisement
7/7
त्यांचे हात, पाय, डोके आणि खालचा भाग विकसित झाला होता. डॉक्टरांनी घाईघाईने मुलीचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. कसंबसं डॉक्टरांनी ते तिच्या डोक्यातून बाहेर काढलं.मिररच्या रिपोर्टनुसार, ही घटना 1982 मध्ये घडली होती. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बापरे! 6 महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात वाढत होती जुळी मुलं; पाहून डॉक्टरही शॉक