TRENDING:

Snake Facts: साप सरसकट सर्वांना दंश करत नाही, जो 'असा' दिसतो त्यालाच तो डसतो!

Last Updated:
तज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही सापाला माणसांजवळ यायला आवडत नाही, ते कधीच माणसांना त्यांची शिकार म्हणून पाहत नाहीत. सापांचा कधीच माणसांवर हल्ला करण्याचा हेतू नसतो.
advertisement
1/5
Snake Facts: साप सरसकट सर्वांना दंश करत नाही, जो 'असा' दिसतो त्यालाच तो डसतो!
सापाला पृथ्वीवरील धोकादायक शिकारी मानलं जातं. साप दिसताच भल्याभल्यांना थरकाप भरतो. साप आपलाच पाठलाग करत इथवर आला असा विचार करून त्याच्यावर अनेकजण वार करतात. मात्र त्याच्या मनात मात्र असं काहीच नसतं.
advertisement
2/5
तज्ज्ञांच्या मते, माणसांना सापांची जेवढी भीती वाटते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त साप आपल्याला घाबरतात. पण मग साप नेमके हल्ला का आणि कधी करतात?
advertisement
3/5
साप हा पृथ्वीवरील सर्वात विषारी जीवांपैकी एक जीव आहे यात कोणतंही दुमत नाही. Black mamba, Inland taipan अशा सापांच्या काही प्रजाती एवढ्या खतरनाक आहेत की, त्यांच्या केवळ एका थेंबाने दहापेक्षा जास्त लोकांचा जीव जाऊ शकतो. परंतु म्हणून साप सर्वांवर हल्ला करत सुटतात, यात काही तथ्य नाहीये.
advertisement
4/5
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा साप माणसाला पाहतो तेव्हा त्याला वाटतं की, एखादा शिकारी आपली <a href="https://news18marathi.com/viral/tiger-fear-bear-animal-fight-shocking-video-viral-on-social-media-mhpl-1171698.html">शिकार</a> करायला येतोय. त्यामुळे शिकारी जवळ येताच साप पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा घाबरून झडप घालतो.
advertisement
5/5
शक्यतो <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/why-snake-increased-in-summer-why-they-become-most-dangerous-in-this-hots-season-know-facts-of-snake-mhds-1170037.html">साप</a> माणसांना पाहून लपण्याचाच प्रयत्न करतो. परंतु माणसं आणखी जवळ येऊ लागली की, तो <a href="https://news18marathi.com/viral/cat-put-hand-in-crocodile-mouth-animal-video-viral-trending-news-mhpl-1012384.html">डसतो</a>. जेव्हा साप घाबरतो तेव्हाच तो दंश करतो, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Facts: साप सरसकट सर्वांना दंश करत नाही, जो 'असा' दिसतो त्यालाच तो डसतो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल