TRENDING:

नारळाच्या झाड्यातून येत होता विचित्र आवाज, शेतकऱ्यानं घाबरत तोडताच जे दिसलं ते धक्कादायक, पाहणारे सगळेच घाबरले

Last Updated:
जेव्हा शेतकऱ्याने हिंम्मत करून तणा फोडला तेव्हा शेतकऱ्याला आत जे दिसलं ते दृश्य पाहून गावकरीही हादरले. त्यात त्यांना असी वस्तू दिसली ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल.
advertisement
1/8
नारळाच्या झाड्यातून विचित्र आवाज, शेतकऱ्यानं घाबरत तोडताच जे दिसलं ते धक्कादायक
आजकाल सोशल मीडियावर काही ना काही आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येतात. कधी प्राणी-पक्ष्यांचे गमतीशीर किस्से लोकांना हसवतात तर कधी भीतीदायक दृश्यं सगळ्यांनाच थक्क करून टाकतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या इंडोनेशियातून व्हायरल झाला आहे, ज्याने लोकांना अक्षरशः गोंधळवून टाकलंय.
advertisement
2/8
हा प्रकार एका जुन्या नारळाच्या खोडाशी संबंधित आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की या नारळाच्या तणामधून काही दिवसांपासून विचित्र आवाज येत होते. रात्रीच्या वेळी खटखट, ठकठक आवाज ऐकू यायचा. सगळ्यांना वाटायचं आत काही भूत आहे की काय, तर काहींनी उंदरं किंवा साप असावेत असा अंदाज वर्तवला.
advertisement
3/8
पण जेव्हा शेतकऱ्याने हिंम्मत करून तणा फोडला तेव्हा शेतकऱ्याला आत जे दिसलं ते दृश्य पाहून गावकरीही हादरले. त्यात त्यांना असी वस्तू दिसली ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल.
advertisement
4/8
तण्यातून बाहेर आलं ‘खेकड्यांचं घरटं’व्हिडिओमध्ये दिसतं की तणा फोडताच आतून खेकड्यांचा अक्षरशः "कौटुंबिक संसार" बाहेर आला. त्यामध्ये इतके खेकडे होते की मोजणेही शक्य नव्हतं. हे दृश्य सुमात्रा किंवा जावा बेटावरील एका गावातलं असल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
5/8
खेकडे नारळाच्या तण्यात का राहतात?तज्ञांच्या मते हे घोस्ट क्रॅब्स किंवा मॅंग्रोव्ह क्रॅब्स असतात. त्यांना सडलेली, ओलसर झाडांची सालं आणि पोकळ तणं खूप आवडतात. नारळाचा तणा ओलावा शोषतो, आत हवा कमी असते आणि ते खेकड्यांसाठी उत्तम घर बनतं. तिथेच ते अंडी घालतात, शिकार करतात आणि शत्रूपासून लपतात.
advertisement
6/8
एका अभ्यासात आढळलंय की उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये तब्बल 70% खेकडे अशा सडलेल्या झाडांच्या तुकड्यांमध्ये घरं करतात.
advertisement
7/8
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. इंस्टाग्रामवर एका यूजरने लिहिलं, “आता माझं घरही तपासून बघतो” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे तर हॉरर मूव्हीसारखं आहे!”
advertisement
8/8
इंडोनेशियाच्या पर्यावरण विभागाने मात्र इशारा दिलाय की असे तणे विनाकारण तोडू नयेत. कारण अचानक बाहेर आलेले खेकडे पिकं खाऊन नुकसान करू शकतात. तसेच हेच खेकडे जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहेत, कारण ते कीटक आणि इतर जंतूंवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे एकूण काय, हा प्रकार जितका भयानक वाटतो तितकाच तो निसर्गाच्या अद्भुत चक्राचाही एक भाग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
नारळाच्या झाड्यातून येत होता विचित्र आवाज, शेतकऱ्यानं घाबरत तोडताच जे दिसलं ते धक्कादायक, पाहणारे सगळेच घाबरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल