गड्यानं कमालंच केली, विमानाचं तिकीट झालं कॅन्सल, तर 1800 किलोमीटर कार चालवत पोहोचला, कारण काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून, राजकीय पक्षांकडून आवाहन करण्यात येत आहे. यातच आता एक मतदाराची सर्वत्र चर्चा होत आहे. (सागर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

तब्बल 1800 किमी स्वत: कार चालवून हा व्यक्ती फक्त मतदान करण्यासाठी आला. प्रशांत तिवारी असे या व्यक्तीचे नाव आहे. ते सागर येथील जैसीनगर येथील रहिवासी आहेत. ते 12 वर्षांपासून बंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत आहेत. ते प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला आपल्या गावी येतात.
advertisement
2/5
यावेळी त्यांना मतदान करायला गावी यायचे होते. त्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीकडून सुट्टीही घेतली. तसेच विमानाचे तिकीटही बुक केले. मात्र, ऐनवेळी त्यांचे तिकीट रद्द झाले. त्यानंतर त्यांनी कमालच केली.
advertisement
3/5
प्रशांत यांनी आपली कार घेतली आणि ते सागर याठिकाणी यायला निघाले. तीन दिवस त्यांनी कारने प्रवास केला आणि ते बंगळुरू येथून आपल्या गावी पोहोचले. पहिल्या दिवशी त्यांनी हैदराबादपर्यंतचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथून निघून ते मध्यप्रदेशातील बैतूल याठिकाणी पाहोचले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ते बैतूल येथून सागरच्या मार्गाने जैसीनगर याठिकाणी पोहोचले.
advertisement
4/5
येथे त्यांनी मतदान केले. तसेच इतर लोकांनाही मतदान करण्यासाठी आवाहन केले. मी फक्त मतदान करण्यासाठी तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास करुन पोहोचलो आहे. स्वत: कार चालवून याठिकाणी पोहोचलो आहे. यासाठी हजारो रुपयांचे पेट्रोल लागले. मात्र, तरीही मी फक्त मतदान करण्यासाठी याठिकाणी आलो, असे त्यांनी लोकांना सांगितले.
advertisement
5/5
दरम्यान, काल मंगळवारी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यामध्ये मध्यप्रदेशातील सागर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान झाले. याठिकाणी मतदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
गड्यानं कमालंच केली, विमानाचं तिकीट झालं कॅन्सल, तर 1800 किलोमीटर कार चालवत पोहोचला, कारण काय?