TRENDING:

Bhang Fact : भांग प्यायल्यावर नेमकं काय होतं? माणसाच्या शरीर आणि मेंदूसोबत कसा होतो गोंधळ?

Last Updated:
भांग म्हटलं की लोकांच्या मनात हे येतंच की हे मादक आहे, पण ते माणसावर कसा परिणाम करतात? किवा त्याचा तुमच्या मेंदूवर कोणता परिणाम होतो?
advertisement
1/11
भांग प्यायल्यावर नेमकं काय होतं? माणसाच्या शरीर आणि मेंदूसोबत कसा होतो गोंधळ?
होळीचा उत्सव म्हटलं की रंग, पाणी, सफेद कपडे यासगळ्या गोष्टी मनात येतात. या सोबतच आणखी एक गोष्ट आवर्जून लोकांना आठवते ती म्हणजे भांग. होळीच्या दिवशी लोक भांग पितात किंवा तिला खाताच.
advertisement
2/11
उत्तरेच्या राज्यांमध्ये ही परंपरा कॉमन आहे. पण भांग म्हटलं की लोकांच्या मनात हे येतंच की हे मादक आहे, पण ते माणसावर कसा परिणाम करतात? किवा त्याचा तुमच्या मेंदूवर कोणता परिणाम होतो?
advertisement
3/11
बीबीसीच्या अहवालानुसार, टेट्राहाइड्रोकानाबिनॉल गांजामध्ये आढळते, ज्याला टीएचसीम किंवा विड देखील म्हणतात. भांग हा गांजाच्या झाडाचा एक भाग आहे.
advertisement
4/11
गांजाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील डोपामाइन हार्मोन वाढते. या संप्रेरकाला आनंद वाढवणारे संप्रेरक असेही म्हणतात. तीच गोष्ट भांगसाठी देखील लागू होते. ज्यामुळे लोकांना खूप आनंदी असल्यासारखं वाटतं आणि लोक खूप स्लो होतात.
advertisement
5/11
जगाच्या विविध भागात भांगचं सेवन अनेक प्रकारे केलं जातं. काही लोक ते चघळतात किंवा ठेचून पितात, तर काही जण सिगारेटप्रमाणे धुम्रपान करतात.
advertisement
6/11
तुम्ही भांग खाल्या किंवा प्याल्यास, नशा चढण्यास 45 ते 60 मिनिटे लागू शकतात. सिगारेटप्रमाणे धुम्रपान केल्यास 10 ते 15 मिनिटांत तुम्हाला नशा चढते.
advertisement
7/11
भांगची नशा आपला मेंदू अतिक्रियाशील बनवते. यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते आणि एखाद्याला त्याच्या सभोवतालच्या गोष्टी म्हणजेच आजूबाजूला काय चाललंय हे जाणवतच नाही.
advertisement
8/11
डॉक्टरांच्या मते, भांग जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. मेंदू व्यवस्थित काम करणं थांबवतो. मनात विचित्र विचार येऊ लागतात आणि हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाबाचा धोका वाढतो.
advertisement
9/11
महिलांनी जास्त प्रमाणात गांजा किंवा भांगचं सेवन केल्यास गर्भधारणेदरम्यान त्रास होऊ शकतो.
advertisement
10/11
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भांगचे बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भांग मानसिक आजारांमध्ये वापरली जाते. स्मृती परत मिळविण्यासाठी मर्यादित प्रमाणात देखील याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासूनही यामुळे आराम मिळू शकतो.
advertisement
11/11
(ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bhang Fact : भांग प्यायल्यावर नेमकं काय होतं? माणसाच्या शरीर आणि मेंदूसोबत कसा होतो गोंधळ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल