Chicken Facts : कोंबडा किती वर्षे जिवंत राहतो, कोंबड्याचं आयुष्य किती असतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chicken Life : कोंबडी किंवा कोंबड्याचं मांस ज्याला चिकन म्हणतात ते खायला अनेकांना आवडतं. त्यांना मारणं वेगळं पण नाहीतर अशा कोंबड्या किती वर्षे जगतात माहितीये का?
advertisement
1/7

कोंबडा म्हणताच अनेकांना चिकनच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं असेल. साधारणपणे लोकांना भातासोबत चिकन खायला आवडतं. मुर्गा भात, चिकन बिर्याणी असे अनेक पदार्थ लोकांना आवडतात.
advertisement
2/7
आता जर आपण कोंबडी आणि मानव यांच्यातील नातेसंबंधाबद्दल बोललो तर खरंतर याचं कारण भातशेती आहे. भाताची लागवड जसजशी वाढत गेली तसतसे रेड जंगल फाऊल जंगलातून माणसांच्या जवळ येऊ लागले.
advertisement
3/7
हा कोंबड्यासारखा दिसणारा एक पक्षी जो भात चोरण्यासाठी यायचा. हळूहळू त्याच्यात आणि माणसांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. मानवांनी रेड जंगल फाऊलच्या दोन प्रजातींचं पालन केले, ज्या नंतर घरगुती कोंबडी बनल्या.
advertisement
4/7
पूर्वीच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, कोंबडा पाळण्याची परंपरा 10 हजार वर्षांपूर्वी आशियामध्ये, विशेषतः चीन, दक्षिण-पूर्व आशिया किंवा भारतात सुरू झाली.
advertisement
5/7
खरं तर युरोपियन संशोधकांनी मजबूत पुरावे दिले आहेत की मानवाने सुमारे 1500 ईसापूर्व, म्हणजे सुमारे 3522 वर्षांपूर्वी कोंबडीचे पालन करण्यास सुरुवात केली.
advertisement
6/7
संशोधनात मिळालेल्या पुराव्यांनुसार, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, म्यानमार आणि थायलंडमध्ये प्रथम त्यांचं संगोपन करण्यात आलं.
advertisement
7/7
आता लोक कोंबड्या खातात, तेव्हा त्यांचं आयुष्य संपतं पण सामान्यपणे कोंबड्या किती वर्षे जिवंत राहतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माहितीनुसार कोंबडा आणि कोंबडीचं वय 5 ते 10 वर्षे असतं. इतकी वर्षे ते जगू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chicken Facts : कोंबडा किती वर्षे जिवंत राहतो, कोंबड्याचं आयुष्य किती असतं?