Mosquito Bite: डास चावल्यानंतर खाज का येते? यामागे आहे भन्नाट कारण!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची फौज पहायला मिळते. तुम्ही कधी विचार केलाय का डास चावल्यावर खाज का येते?
advertisement
1/7

घराच्या कानाकोपऱ्यात डास लपलेले असतात. त्यामुळे बऱ्याचदा घरात खूप डास चावतात. विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची फौज पहायला मिळते. तुम्ही कधी विचार केलाय का डास चावल्यावर खाज का येते?
advertisement
2/7
डास चावा घेताना माणसाच्या शरीरातून रक्त शोषून घेतात. त्यांच्या चाव्यानंतर लगेच खाज यायला सुरुवात होते आणि ती जागा लाल होते.
advertisement
3/7
डास चावलेल्या जागेवर सतत खाज येत राहते. मात्र यामागे काय कारण आहे हा कधी विचार केलाय का? यामागे कमाल सायंस आहे.
advertisement
4/7
एखादा डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा तो त्याचा डंक शरीरात घुसवतो. त्वचेतून आत डंक घालून तो रक्क शोषून घेतो. यावेळी डासांची लाळ त्याच्या प्रोबोस्किसमधून बाहेर पडते आणि आपल्या शरीरात जाते.
advertisement
5/7
डासांची लाळ शरीरात जाताच आपली शरीरातील प्रतिकारशक्ती त्याच्याशी लढा देऊ लागते. ही प्रक्रिया सुरु असताना डास चावलेल्या जागी खाज येते आणि ती जागा लाल होते. त्या जागी सुजही येते.
advertisement
6/7
नर डास कोणालाही चावत नाहीत. संशोधनानुसार केवळ मादी डास लोकांचे रक्त शोषतात. पुनरुत्पादन आणि मुलांना जन्म देण्यासाठी ते रक्त शोषत असतात.
advertisement
7/7
शरीराच्या दुर्गंधीमुळे आणि रक्ताच्या प्रकारामुळे असं घडतं. उन्हाळ्यात शरीरातून बाहेर पडणारा घाम डासांना आकर्षित करतो. याच कारणामुळे उन्हाळ्यात डास जास्त प्रमाणात डास चावतात.