मणिकर्णिका घाटाची गुपित प्रथा, इथे प्रत्येक मृतदेहावर का लिहिलं जातं '94', अंकामागचं रहस्य काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असे मानले जाते की भगवान विष्णूंनी येथे कठोर तपस्या होती आणि त्यांच्या चक्राने मणिकर्णिका कुंडाची निर्मिती झाली. या कुंडात भगवान विष्णूचा मणी आणि माता पार्वतीचा कुंडल पडला होता. त्या घटनेवरून या घाटाला मणिकर्णिका हे नाव मिळालं.
advertisement
1/7

भारतीय संस्कृतीत काही नगरे अशी आहेत जी केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर अध्यात्मिक दृष्ट्याही अद्वितीय मानली जातात. त्यापैकीच एक म्हणजे काशी. या नगरीबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे येणाऱ्या प्रत्येकाला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. वाराणसीत गंगेच्या तीरावर वसलेला मणिकर्णिका घाट मृतात्म्यांच्या अंतिम संस्कारासाठी सर्वात पवित्र मानला जातो. येथे अंत्यसंस्कार केल्यास आत्म्याला थेट स्वर्गाची प्राप्ती होते, अशी अढळ श्रद्धा हिंदूंमध्ये आहे.
advertisement
2/7
मणिकर्णिका घाटाबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. याचा उल्लेख स्कंद पुराण आणि काशी कांडसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये देखील आढळतो. असे मानले जाते की भगवान विष्णूंनी येथे कठोर तपस्या होती आणि त्यांच्या चक्राने मणिकर्णिका कुंडाची निर्मिती झाली. या कुंडात भगवान विष्णूचा मणी आणि माता पार्वतीचा कुंडल पडला होता. त्या घटनेवरून या घाटाला मणिकर्णिका हे नाव मिळालं.
advertisement
3/7
या घाटाशी संबंधित एक अनोखी परंपरा आजही प्रचलित आहे. ती म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक मृतदेहावर 94 असा अंक लिहिण्याची प्रथा. पण असं का केलं जातं असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.
advertisement
4/7
दाहसंस्कारापूर्वी दाहकर्ता बेर किंवा लाकडाने शवावर 94 हा अंक लिहितो. विद्वानांच्या मते, प्रत्येक मनुष्यात 94 गुण (मुक्ती मंत्र) असतात. हे गुण त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार वाढतात किंवा घटतात.
advertisement
5/7
पुराणानुसार, सृष्टीकर्ता ब्रह्मा प्रत्येक व्यक्तीला सहा महत्त्वाचे गुण प्रदान करतात. जो मनुष्य या सहाही गुणांनी परिपूर्ण असतो, त्याला सर्व सद्गुण आपोआप प्राप्त होतात. त्यामुळे, मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार करताना हे 94 गुण शरीरास समर्पित केले जातात आणि त्यामुळे आत्म्याला मुक्ती आणि मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
advertisement
6/7
हीच कारणे आहेत की वृद्ध किंवा मृत्युप्राय अवस्थेतले लोक आपले शेवटचे दिवस काशीमध्ये व्यतीत करण्यास प्राधान्य देतात. मणिकर्णिका घाट, 94 नंबरची प्रथा आणि याच्याशी निगडीत पारंपरिक श्रद्धा यांनी काशीला भारतीय अध्यात्माचे केंद्र बनवले आहे.
advertisement
7/7
(अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरील सामाजिक माहितीनुसार आहे. News18 मराठीने याची पुष्टी केलेली नाही. कृपया यातील गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मणिकर्णिका घाटाची गुपित प्रथा, इथे प्रत्येक मृतदेहावर का लिहिलं जातं '94', अंकामागचं रहस्य काय?