TRENDING:

Mahakumbh 2025 Sadhu : ...म्हणून साधू लांब जटा ठेवतात, कधीच कापत नाहीत, फक्त धार्मिक नाही वैज्ञानिक कारण

Last Updated:
Sadhu hair dreadlocks : साधूंचे लांब केस, जटा तुम्ही पाहिल्या असतील. या जटा ते कधीच कापत नाही. या जटेचा इतका फायदा आहे की तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
1/9
...म्हणून साधू लांब जटा ठेवतात, कधी कापत नाहीत, फक्त धार्मिक नाही वैज्ञानिक कारण
तुम्ही साधू, संतांना पाहिलं असेल तर एक गोष्ट आवर्जून तुमच्या लक्षात आली असेल. भगवे वस्त्र घालण्याशिवाय या साधूंची लांब दाढी आणि सोबत लांब जटाही असतात.  साधूंना लांब जटा असण्यामागे धार्मिक तसंच वैज्ञानिक कारणही आहे.
advertisement
2/9
लांब जटा म्हणजे साधूंच्या आयुष्याचा त्याग, तपस्या आणि नैसर्गिक जीवनशैलीचं प्रतीक आहे. साधूंच्या मते, जटा त्यांच्या दीर्घ ध्यान आणि साधनेची निशाणी आहे, त्यांच्या तपस्वी आयुष्याचं प्रतीक आहे. कौटुंबिक इच्छा आणि मोहमायापासून दूर राहण्याचं प्रतीक.
advertisement
3/9
धार्मिक कारण म्हणजे हे वैराग्याचं प्रतीक आहे. याचा भगवान शंकराशी संबंध आहे. भगवान शंकराला जटाधारी म्हणतात. साधू शंकराला आपला आदर्श मानतात आणि त्याच्या जीवनशैलीचं अनुकरण करत लांब जटा ठेवतात.
advertisement
4/9
जटा ब्रह्मांडी ऊर्जा आत्मसात करण्याचं माध्यम आहे. जे साधूंना ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासात मदत करतं, असं म्हणतात.
advertisement
5/9
यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे ऊर्जेचं संरक्षण. लांब केस किंवा जटांमुळे डोक्याच्या चारही बाजूने एक नैसर्गिक आवरण तयार होतं जे गरमी आणि ऊर्जा राखून ठेवण्यात मदत करतं. यामुळे साधूंना थंड आणि गरम वातावरणात संतुलन बनवण्यात मदत होते.
advertisement
6/9
जटा डोक्यासाठी नैसर्गिक इन्सुलेशनचं काम करतात. वाळवंट, जंगल, डोंगराळ भाग यासारख्या कठीण वातावरणात उन्हाळा, थंडी आणि धूळीपासून केस डोक्याला वाचवतात.
advertisement
7/9
नर्व्हस सिस्टमवरही याचा परिणाम होतो. डोक्याचे केस नर्व्हस सिस्टमशी जोडलेले असतात. डोक्यातील नसांना स्थिरता आणि शांतता देतात. जटांमुळे ध्यान आणि मानसिक शांती वाढते.
advertisement
8/9
याचा आरोग्यालाही फायदा आहे. जटांमुळे केसांची मुळं खेचली जातात. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं.
advertisement
9/9
साधू जटा कापत नाहीत, सोडवत नाहीत कारण ते निसर्गाशी जोडलेले राहतात, या जटा त्यांच्या नैसर्गिक जीवशैलीप्रती त्यांची निष्ठा दाखवतात. (फोटो : AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mahakumbh 2025 Sadhu : ...म्हणून साधू लांब जटा ठेवतात, कधीच कापत नाहीत, फक्त धार्मिक नाही वैज्ञानिक कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल