TRENDING:

Indian Railway : रेल्वेमध्ये एकटीच चढली महिला, रात्री झोपेतून अचानक आली जाग, सीट खाली जे दिलं ते पाहून किंचाळली महिला

Last Updated:
एकट्या महिलेला ट्रेनने प्रवास करणं हे अधिक चिंतेचं कारण ठरतं. पण या धास्तीला वास्तवाचं रूप दिलं एका घटनेने, जी नुकतीच दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एपी एक्सप्रेसमध्ये घडली.
advertisement
1/7
रात्री ट्रेनमध्ये अचानक आली जाग, सीट खाली जे दिलं ते पाहून किंचाळली महिला
रेल्वेमध्ये प्रवास करणं जितकं सोयीचं आहे, तितकेच ते चॅलेंजिंग देखील आहे. कारण सामानसह प्रवास करणं आणि त्यांना चोरट्यांपासून वाचवनं कधीकधी कठिण होतं. तसेच एकट्या महिलेला ट्रेनने प्रवास करणं हे अधिक चिंतेचं कारण ठरतं. पण या धास्तीला वास्तवाचं रूप दिलं एका घटनेने, जी नुकतीच दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एपी एक्सप्रेसमध्ये घडली.
advertisement
2/7
ही घटना आहे ओडिशामधील रामगड जिल्ह्यातील गुनपूर पोलीस ठाणे हद्दीतील वर्षा राणी कुंभकार या महिला प्रवाशाची आहे. ती 20806 क्रमांकाच्या एपी एक्सप्रेसच्या एस-6 स्लीपर कोचमध्ये एकटी प्रवास करत होती. ट्रेन रात्री 8 वाजता दिल्लीहून रवाना झाली आणि साधारण ती महिला रात्री 10 वाजता झोपली.
advertisement
3/7
रात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाँसी स्थानकात ट्रेन पोहोचल्यावर तिची झोपमोड झाली. तिने जेव्हा आपली बॅग पाहण्यासाठी सीटखाली पाहिलं, तेव्हा ती बॅग गायब असल्याचं लक्षात आलं. ही एक निळ्या रंगाची ट्रॉली होती, ज्यात जवळपास 89,000 रुपयांचा माल आणि 70,000 रुपये किमतीची सोन्याची चेन होती.
advertisement
4/7
वर्षा यांनी तात्काळ सीपीडी (क्राइम प्रिव्हेन्शन डिटेक्शन) टीमला माहिती दिली. टीममध्ये असलेले जितेंद्र सिंह यादव, उमेश कुमार, तौसीफ खान, विक्रम सिंह यादव आणि हेमंत कुमार या अधिकाऱ्यांनी त्वरित तपास सुरू केला. झाँसी स्थानकावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती त्या बॅगसह ट्रेनमधून उतरून दुसऱ्या ट्रेनमध्ये चढताना आढळला.
advertisement
5/7
तो चोरट्या प्रवाशाने पुढे मथुरा स्टेशनपर्यंत पोहोचलेली ट्रेन पकडली होती. या गाडीचा क्रमांक 12405 असून, तो एस-4 कोचमध्ये बसलेला होता. रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) अधिकारी सुजीत सिंह चंदेल आणि त्यांच्या टीमने त्या ट्रेनमध्ये जाऊन त्या व्यक्तीला खाली उतरवलं.
advertisement
6/7
महिला प्रवाशाने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या संशयिताची ओळख पटवली आणि बॅगही तिची असल्याचं सांगितलं. त्यानंतर जीआरपी भोपालमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आणि संपूर्ण माल जप्त करण्यात आला.
advertisement
7/7
प्रवास करताना बॅग सीटखाली ठेवण्याऐवजी ती नजरेला पडेल तिथे ठेवा. स्लीपर कोचमध्ये एकट्याने प्रवास करत असाल, तर बॅगला चेन लॉक लावणं योग्य. रेल्वे सुरक्षा टीमचे हेल्पलाइन नंबर लक्षात ठेवा. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ माहिती द्या. रेल्वे प्रवासात सुरक्षेची जबाबदारी प्रवाशांचीसुद्धा तितकीच असते. सावधगिरी बाळगल्यास अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : रेल्वेमध्ये एकटीच चढली महिला, रात्री झोपेतून अचानक आली जाग, सीट खाली जे दिलं ते पाहून किंचाळली महिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल