Fastest Fish : जगातला सगळ्यात जलद मासा; भाल्यासारखं लांब नाक, वार होताच शिकार सेकंदात गार!
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
समुद्रात नानाविध प्रकारचे अतिशय सुंदर मासे असतात. प्रत्येक माशाचं वेगळं वैशिष्ट्य असतं. समुद्रात जगातला सर्वांत लहान मासा आढळतो आणि सर्वांत मोठा मासादेखील आढळतो. सर्वांत लहान माशाची लांबी केवळ एक सेंटिमीटर आहे. समुद्रात एक असा मासादेखील आढळतो ज्याचा वेग गाड्यांच्या सुपरस्पीडलाही मागे टाकतो. या माशाचं नाव 'सेलफिश' असं आहे.
advertisement
1/10

हा मासा दुरून पाहिल्यास तो एखाद्या शिडाच्या होडीसारखा दिसतो. त्याच्यामध्ये गाड्यांनाही मागे टाकण्याची क्षमता आहे. सेलफिशचं वजन सुमारे 90 किलो आणि लांबी सुमारे दोन ते तीन मीटर असते. या माशाचा वेग आणि पाठीवर असलेला शिडासारखा पंख ही त्याची वैशिष्ट्यं आहेत. कधीकधी हा पंख माशाच्या शरीरापेक्षाही मोठा दिसतो. त्यामुळेच त्याला सेलफिश असं नाव देण्यात आलं आहे. या माशाचं नाक अर्धा मीटर ते एक मीटर लांब असतं.
advertisement
2/10
सेलफिश सहसा लहान माशांची शिकार करतात. त्यासाठी ते त्यांच्या कळपात शिरतात आणि आपलं भाल्यासारखं टोकदार आणि पातळ नाक लहान माशाच्या शरीराला टोचतात. कळपातला एक किंवा अनेक मासे त्याच्या या नाकात अडकतात.
advertisement
3/10
सेलफिश हा लांब आणि निळसर-तपकिरी रंगाचा मासा असतो. अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या उबदार पाण्यात ते आढळतात. भारतातल्या कोचीन आणि त्याच्या आसपासच्या किनारी भागातदेखील हे मासे आढलतात. विशेष म्हणजे हे मासे मानवी आहारात वापरले जात नाही. त्यांना फक्त मनोरंजनासाठी पकडलं जातं.
advertisement
4/10
सेलफिश हा जगातला सर्वांत वेगाने पोहणारा मासा आहे. अनेक गाड्यांना मागे टाकण्याची क्षमता त्याच्या वेगात आहे. हे मासे ताशी 110 किलोमीटर वेगाने पोहू शकतात. ऑलिम्पिक जलतरणपटू ताशी आठ किलोमीटर वेगाने पोहतो. सर्वांत वेगवान शार्क ताशी 50 किमी वेगाने पोहतात. जमिनीवरचा सर्वांत वेगवान प्राणी असलेला चित्ता ताशी 130 किमी वेगाने धावतो. पेरेग्रीन फाल्कन हा सर्वांत वेगवान पक्षी ताशी 390 किमी वेगाने उडतो.
advertisement
5/10
सेलफिश कधीकधी हवेत लांब उड्या घेतात. त्यामुळे त्यांचा वेग वाढतो. आपली शिकार पकडण्यासाठी ते अनेकदा 335 मीटर खोलीपर्यंत बुडी मारतात. हे मासे शिकारीसाठी गटाने फिरतात.
advertisement
6/10
सेलफिशची चोच वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. त्यांच्या तोंडाचा वरचा जबडा खालच्या भागापेक्षा मोठा असतो. या कारणास्तव त्यांची बिलफिश गटात वर्गवारी केली जाते. सेलफिशच्या अंगावर निळे ठिपके असलेले 20 सरळ पट्टे असतात.
advertisement
7/10
सेलफिश हे स्थलांतर करणारे मासे आहेत. पाणी थंड झाल्यावर ते विषुववृत्ताजवळ येतात. जेव्हा इथे उन्हाळा असतो तेव्हा ते वरच्या अक्षांशांकडे जातात. तरीही ते खूप थंड पाण्यात जात नाहीत. त्यांना मोकळ्या समुद्रात पृष्ठभागाजवळ राहायला आवडतं.
advertisement
8/10
मीलनाच्या हंगामात (ब्रीडिंग पीरियड) मादी सेलफिश नर सेलफिशला आकर्षित करण्यासाठी पंखांचा वापर करते. नर सेलफिश स्वभावाने खूप आक्रमक मानले जातात आणि मादी जोडीदारासाठी इतर नर सेलफिशशी तीव्र स्पर्धा करतात. मादी मिळवण्यासाठी त्यांच्यात शर्यत लागते.
advertisement
9/10
योग्य सेलफिश मादी मिळाल्यानंतर जोडी तयार होते. यानंतर, नर शुक्राणू आणि मादी लाखो अंडी सोडतात. त्यामुळे गर्भाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते. त्यांची पिलं सुरुवातीला खूप लहान असतात. या माशांची जास्तीत जास्त लांबी पहिल्या वर्षीच वाढते.
advertisement
10/10
ज्याप्रमाणे मानवी हस्तक्षेप इतर सागरी जीवसृष्टीसाठी धोकादायक ठरत आहे, त्याचप्रमाणे सेलफिशचं अस्तित्वदेखील धोक्यात आलं आहेत. विशेष म्हणजे अन्नाच्या दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्व फारच कमी आहे. तरीही मनोरंजनासाठी अनेक लोक त्यांचा पाठलाग करून त्यांची शिकार करतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Fastest Fish : जगातला सगळ्यात जलद मासा; भाल्यासारखं लांब नाक, वार होताच शिकार सेकंदात गार!